नवी दिल्ली,दि,२५ एप्रिल २०२५ –पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला यावेळी भारताने वेगळ्या पद्धतीने धडा देण्याचे ठरवल्याचे दिसते. काल मोदी सरकारने सिंधू पाणी करार स्थगित केला, त्याच बरोबर अन्य काही महत्त्वाचे निर्णय घेतले. आता आज गुरुवारी भारताने आणखी ३ महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
गुरुवारी एका प्रभावी भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वचन दिले की भारत अलीकडील पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांना “त्यांच्या कल्पनेपलीकडे” शिक्षा मिळणार आहे दशदवाद्यांना शोधून काढले जाईल. बिहारमधून बोलताना त्यांनी जाहीर केले की दहशतवाद कधीही भारताच्या आत्म्याला तडा देणार नाही आणि न्याय दिला जाईल. पहलगाममधील बैसरन येथे झालेल्या हल्ल्यानंतर हे त्यांचे पहिलेच सार्वजनिक विधान होते, ज्यामध्ये २७ लोकांचा मृत्यू झाला होता.
“मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आपल्यासोबत आहे” असे म्हणत मोदींनी एकता व्यक्त करणाऱ्या जागतिक नेत्यांचे आणि नागरिकांचे आभार मानले. त्यांनी हा हल्ला भारताच्या आत्म्यावरील हल्ला असल्याचे वर्णन केले आणि देशाला एकजूट राहण्याचे आवाहन केले. त्यांच्या भाषणापूर्वी बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक क्षण मौन पाळण्यात आले, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही या हल्ल्याचा निषेध केला.
अमानुष दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं पाऊल उचललं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) जर्मनी, जपान, पोलंड, ब्रिटन, रशिया यांसारख्या प्रमुख राष्ट्रांसह २० पेक्षा अधिक देशांच्या राजदूतांना विशेष माहिती सत्रासाठी दक्षिण ब्लॉक येथील कार्यालयात पाचारण केलं. या बैठकीत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दहशतवादी हल्ल्याविषयी सविस्तर माहिती दिली. ज्यामध्ये हल्ल्याचे स्वरूप, त्याची अमानुषता आणि त्यामागे असलेल्या शक्तींची माहिती समाविष्ट होती.