नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक महानगरपालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव डॉ. सुवर्णा वाजे असल्याचे समजते. त्या मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. प्राथमिक माहितीनुसार मुंबई आग्रा हायवे लगत असलेल्या रायगड नगर या गावाजवळ लष्कराच्या सराव मैदानाच्या गेट जवळ गाडीत पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. कालच त्यांच्या कुटुंबीयांनी त्या मिसिंग असल्याची पोलिसात तक्रार दाखल केली होती.तेव्हापासून नाशिक पोलीस त्यांचा शोध घेत होते. यादरम्यान रायगड नगर या गावाजवळ मंगळवारी रात्री ९ ते १० च्या सुमारास लष्कराच्या सराव मैदानाच्या गेट जवळ त्यांची जळालेल्या अवस्थेत गाडी सापडली.या गाडीत सुवर्णा वाजे यांच्या मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. दरम्यान, यामागे घातपाताची शक्यता नाही ना ? अश्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत याप्रकरणी नाशिक पोलीस अधिक तपास करत आहेत.