नाशिक जिल्ह्यातील या तीन तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण 

0

नाशिक – नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत ९७३ रुग्णांवर उपचार सुरू सुरु असून नाशिक शहरासह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ,निफाड,आणि येवला या तालुक्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असल्याचे अहवालात आढळून आले आहे.सध्यस्थितीत ग्रामीण भागात ६३९ ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत असून शहरात ३०० ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त झाली आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९९  हजार १०९  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सद्यस्थितीत ९७३ रुग्णांवर उपचार सुरू आहे.  तसेच आत्तापर्यंत ८ हजार ६३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ६४,  बागलाण १०, चांदवड २५, देवळा १६, दिंडोरी ४१, इगतपुरी ०७, कळवण १३, मालेगाव १५, नांदगाव ११, निफाड ११४, पेठ ०१, सिन्नर २०७, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ०७, येवला १०८ असे एकूण ६३९ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३००,  मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २४  तर  जिल्ह्याबाहेरील १०  रुग्ण असून असे एकूण ९७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ८ हजार ७२१  रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ०१,  बागलाण ०१ चांदवड ००, देवळा ००, दिंडोरी ०१, इगतपुरी ००, कळवण ०१, मालेगाव ००, नांदगाव ०१, निफाड ०२, पेठ ००, सिन्नर ०५, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ००, येवला ०० असे एकूण १२ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९६.९२ टक्के, नाशिक शहरात ९८.१३  टक्के, मालेगाव मध्ये ९६.९८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.६६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ४ हजार १७० नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ९८६ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५७ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ६३९  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

लक्षणीय :

४ लाख ८ हजार ७२१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ९९  हजार १०९ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  ९७३  पॉझिटिव्ह रुग्ण.

जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ टक्के.

(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.