महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने
संजय राऊत यांचे सूचक ट्विट : आदित्य ठाकरे यांनी ट्विटर वरून पर्यावरण मंत्री पदाचा उल्लेख हटवला
मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.महाविकास आघाडी धोक्यात आली आहे.आज दुपारी १ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कॅबिनेटची बैठक घेऊन मोठी घोषणा करणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारीच राजीनामा देणार असल्याचं बोलले जात आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विटर वरून पर्यावरण मंत्री पदाचा उल्लेख हटवला
विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या बाईटमधून एकनाथ शिंदे हे माझ्याजवळ ४६ आमदारांचं पाठबळ आहे, असं सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खिळखिळी केल्यानंतर ठाकरे सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. एकनाथ शिंदेच्या शक्तीप्रदर्शना नंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. अशातच सरकार कोसळण्याच्या चर्चा सुरु असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरुन मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे.आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन बायो हटवल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022