नाशिक ,दि.२ सप्टेंबर २०२३ –जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलनाकांवर पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठीमार व गोळीबाराच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चातर्फे आज रविवार दि. ३ सप्टेंबररोजी नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे.या बाबत सोशल मिडिया वरून आवाहन करण्याऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या आहे.या नाशिक बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आले आहे असे हि म्हंटले आहे. बंदच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांतर्फे सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मराठा मराठा समाज बांधवांनी रविवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमावे.त्यानंतर रॅली काढून राष्ट्रातील सर्व व्यावसायिक उद्योजक आणि संस्थांना बंद यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांतर्फे सांगण्यात आले.समाज बांधवांनी शांततेत बंद पाळावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.