राजा रानी दिसणार कुल लुकमध्ये

0

मुंबई : कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजीवनीच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.संजूने अनेक अडथळ्यांचा सामना करून रणजीतची निर्दोष मुक्तता केली आणि रणजीतच्या मदतीने गुन्हेगारांना धडा ही शिकवला.

 सर्व अडथळ्याची शर्यत पार करून राजा रानीच्या आयुष्यात आता आनंदाचे क्षण येणार आता राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजू आणि रणजीत लवकरच एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहेत.संजू रणजीतला डेटवर घेऊन जाणार आहे. आणि याचसाठी राजा रानी कुल लुकमध्ये दिसणार आहेत. खास डेटसाठीची संजूची जय्यत तयारी देखील आहे. संजीवनी आता बुलेट चालवणार आहे. ही राजा रानीची डेट नक्कीच खास असेल. रणजीतसाठी अजून काय काय सरप्राईझ असणार आहे हे येत्या सोमवारच्या भागामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

राजा रानीची गं जोडी मालिकेचा सोमवारचा विशेष भाग संध्या ७.०० वा. रसिकांना कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.