हरि अनंत,नाशिक
रवि- शनि युती नवमस्थानी झाली असता मातृपितृ सुख लाभत नाही. कुटुंबात अनेक प्रकारचे संकटे येण्याची शक्यता, भावा- भावात वैर निर्माण होते.रवि-शनि युती दशम स्थानी मातृ-पितृ सौख्याची हानी,कुटुंबसौख्याचीही हानी. कुटुंबात छोट्या-छोट्या कारणा- वरून वाद होतात.रवि-शनि युती एकदशस्थानी चांगली असत नाही. मातृसौख्य हानी होते. सुना सुस्वभावी निघणे अवघड.त्यामुळे कुटुंबात बिघाड. आईवर गंडांतर,वडिलांपासून फारसा द्रव्यलाभ होत नाही. कोणत्याही राशीत ही युती चांगली नाही. पण 1,7, 8 राशीत ही युती त्यातले त्यात फार वाईट समजावी.
रवि- शनि युती द्वादशस्थानी जाहली असता कुटुंबात एकमेकांवर संशय.. या संशयावरून भांडणे, एकाच घरात परक्याप्रमाणे व्यवहार.सर्वजण केवळ मतलब साधण्यापूरतेच बोलतात. कुटुंबात दोन-तीन भाऊ असतील त्यात लग्न झालेले भाऊ वेगळे निघतात.. अविवाहित असेल तो मातापित्या सोबत राहतो.
संतती व त्याचे सुखदुःख
रवि- शनि युती दशमस्थानी पुत्रसुखाची हानी..रवि- शनि युती द्वादशस्थानी संततीवर गंडातरे, मानसिक त्रास, संततीला होणाऱ्या त्रासामुळे कुटुंबातील व्यक्तींना सर्वसुख उपलब्ध असूनही त्याचा आनंद मिळत नाही.
सुख- दुःख
रवि- शनि अशुभ दृष्टियोग. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही यश मिळत नाही. सतत निराशा त्यामुळे कुटुंबाला आनंद मिळत नाही.. अशुभ दृष्टी योगामुळे प्रत्येक कामात अपयश.. कर्जाचा बोजा वाढत जातो.रवि-शनि, राहू- केतू युती षष्ठस्थानी असता औदर्याचा केवळ देखावा. शत्रुत्व,शत्रूत स्त्रिया अधिक व त्यांच्या पासून हानी. दुःखद योग शत्रू पासून आर्थिक,शारीरिक नुकसान. चोर, दरोडेखोर यांच्यात सापडून मार खावा लागतो.
रवि- शनि युती अष्टमात सौख्याची आशा कमी, निराशा, वैताग, आत्महत्येचा विचार बळावतो.रवि- शनि युती- नवमस्थानी असता नाना प्रकारचे अडथळे, मानहानी प्रसंग. ही युती विनाश करणाऱ्या फळाची असते.रवि- शनि युती द्वादशस्थानी एकंदरीत अतिशय दुःखदायक
द्रव्यलाभ
शनि- मंगळ युती अष्टमात झाली असता धनलाभात अनेक अडथळे,भागीदाराकडून नुकसान, निराशा.रवि- शनि युती एकादशस्थानी झाली तर फारशी चांगली फळे मिळतील असे नाही. द्रव्यलाभात अनेक अडचणी,अडथळे. देवघेवीच्या व्यवहारात अडचणी,नोकरपासून नुकसान,परिस्थतीत वारंवार क्रमशः (भाग -१३५)
संपर्क- 9096587586