मुंबई – सोनी सब नवीन मालिका ‘जिद्दी दिल – माने ना’ हि नवीन मालिका येत्या ३० ऑगस्ट पासून सुरु होत आहे. या लक्षवेधक रोमांस-केंद्रित कथेमध्ये अनेक पात्रं आहेत, जे पराक्रम एसएएफ (स्पेशल अॅक्शन फोर्स) बेस कॅम्पमध्ये भेटतात. मालिका जीवनाप्रती अत्यंत वेगळा दृष्टिकोन असलेले नवीन उत्साही हि नवीन मालिका पैलू सादर करण्यास सज्ज आहे. शालीन मल्होत्रा, कावेरी प्रियम, कुणाल करण कपूर, दिलजोत छाब्रा, आदित्य देशमुख व सिंपल कौल हे कलाकार प्रमुख भूमिकेत असलेली मालिका ‘जिद्दी दिल – माने ना’ ३० ऑगस्ट पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे.
सध्याच्या अवघड काळामध्ये नागरिक त्यांच्या कुटुंबांच्या व स्वत:च्या सुरक्षिततेसाठी एकमेकांवर अवलंबून असताना या तरूण प्रशिक्षित व नागरी स्वयंसेवक त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पराक्रम एसएएफ बेस कॅम्पमध्ये नोंदणी करण्याचे ठरवतात. कथा पुढे सरकेल तसे प्रेक्षकांना रोमांस, मैत्री बहरताना, तसेच या तरूण कॅडेट्समध्ये देशभक्तीची भावना जागृत होताना पाहायला मिळेल. ते कॅम्पमध्ये टिकून राहण्यासाठी मार्गांचा शोध घेतात.
स्पेशल एजंट करण शेरगिल (शालीन मल्होत्रा) हा कट्टर देशभक्त, शिस्तबद्ध असण्यासोबत त्याच्या जटिल, तीक्ष्ण विश्वासामध्ये इतरांच्या वेदनांप्रती सहानुभूती नाही. त्याच्यासोबत असणार आहे उत्साही व्यक्तिमत्त्व असलेली डॉ. मोनामी (कावेरी प्रियम), जी इतरांची काळजी घेण्याप्रतीच्या दृष्टिकोनामध्ये बदल करण्यासाठी आली आहे. स्पेशल एजंट संजना (दिलजोत छाब्रा) देशाप्रती तिचे कर्तव्य बजावण्यासाठी अथक मेहनत घेते आणि तिच्यासोबत हुज्जत न घातलेलेच बरे आहे. तिचा जोडीदार सिद गंजू (कुणाल करण सिंग) हा श्रीमंत असून जीवन व त्याच्या कर्तव्याप्रती निष्काळजीपणाने वागणारा आहे. स्पेशल एजंट फैजी (आदित्य देशमुख) रोमिओप्रमाणे जीवन जगतो. तो रोमांस करत राहतो, पण दिलेल्या वचनापासून दूर पळतो. तो नर्स कोएलच्या (सिंपल कौल) प्रेमात पडतो, जी स्वावलंबी, समंजस आहे आणि तिच्याकडे प्रेम करण्यासाठी वेळ नाही.
मालिका ‘जिद्दी दिल – माने ना’ उत्साही कथेसह प्रेक्षकांना आकर्षून घेते. यामध्ये प्रेमळ प्रेमकथा, साहस, आनंदी साहचर्य व पार्श्वभूमीमध्ये सुरेखरित्या चालणारे रोमांचक कथानक आहे. सनशाइन प्रॉडक्शन्स निर्मित ‘जिद्दी दिल – माने ना’ विविध पात्र व कथानकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबत त्यांना प्रेरित करण्याचा मनसुबा असलेल्या सोनी सबवरील हृदयस्पर्शी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेमध्ये विजय कश्यप, गुल्फाम हुसैन यांसारखे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
मालिके विषयी सोनी सबचे व्यवसाय प्रमुख नीरज व्यास सांगतात ”आनंदाला प्राधान्य देत सोनी सबमध्ये आम्ही अधिक नवीन, उत्साही व हृदयस्पर्शी कथा सादर करण्यास उत्सुक आहोत. मालिका ‘जिद्दी दिल – माने ना’ सहा कॅडेट्सच्या अॅड्रेनालाइन प्रवासाला दाखवते, जेथे ते प्रेम, जीवन व जीवनातील उद्देशाचा शोध घेतात. मालिकेची संकल्पना व पटकथा अत्यंत अनोखी व वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्यामध्ये सोनी सबचा ब्रॅण्ड विश्वास व कन्टेन्ट तत्त्व सामावलेले आहे. आम्ही या मालिकेसह प्रेक्षकांसाठी उत्साह, नाविन्यता व सर्वांगीण मनोरंजन घेऊन येत आहोत. मी आशा करतो की, प्रेक्षकांना ही मालिका आवडेल.”