हरि अनंत,नाशिक
रवि-शनि युती एकदशस्थानात झाली तर फारशी चांगली फळे मिळतील असे नाही. द्रव्यलाभात अनेक अडचणी, अडथळे देवघेवीच्या व्यवहारात अडचणी, नोकरापासून नुकसान, परिस्थितीत वारंवार बिघाड, मन निराशाजनक 8,7 1,राशीत फारच साधारण फळे देतो.
रवि-शनि युती द्वादशस्थानी झाली असता द्रव्याचा अपव्यय,चोरी,लूटमार यामुळे द्रव्यहानी,ही युती मेष,वृश्चिक राशीत झाली असता प्रतिकूल,तीव्र फळे मिळतात. इतर राशीत कमी प्रमाणात.7,11 राशीत किंचित समाधान.
जमीन -शेतीवाडी
रवि-शनि, राहू-केतू युती षष्ठस्थानी जमीन,शेतीवाडी यातून फायदा होत नाही. प्रयत्न करून शेती घेतली तरी ती काहीतरी कारणाने विकावी लागते.
स्त्रीसुख,पतीसुख व लाभ, दुःख
रवि-शनि युती सप्तमस्थानात झाली असता पती- पत्नी परस्परांस दुःखदायक ठरते. उभयतांचे स्वभाव,वृत्ती,आवड- निवड, विचार प्रकृतीचे गुणधर्म हे सर्व परस्परविरोधी आढळतात. एकमेकांचे तोंड पाहू नये असे प्रसंग येतात. बेबनाव वाढून अपकीर्तीचे प्रकार घडतात. एकमेकाला छळणे,मारामारी,उणे- दुणे काढण्याची वृत्ती असते. प्रसंगी घातपात घडून येतो. जर युतीला मंगळ युतीची भर पडली तर वर्णन करावयास नको असे प्रसंग पती- पत्नीत घडतात. विवाह लवकर होत नाही. झाल्यास सौख्य मिळत नाही.
रवि- शनि युती द्वादशस्थानी पती- पत्नीचे आरोग्य चांगले राहत नाही. रवि – शनि युती सर्वप्रकारचे प्रयत्न इलाज करून ही अल्प विर्यात वाढ होत नाही, त्यामुळे स्त्री कायम असमाधानी. सतत कटकट,
भांडण-आयुष्य
रवि- शनि अशुभ दृष्टीयोग कुटुंबात अकाली मृत्यू, कुटुंबाची मोठी हानी.रवि सह शनी आणि इतर ग्रहाचे फळ रवि-चंद्र- शनि चुकीचे विचारांचा , ढोंगी, प्रवासी,धाडसी,कपटी,दुष्टबुद्धि , अज्ञानी, वाचाळ, धूर्त, अविवेकी पाखंडी, अविश्वासी, अतिशय चंचल .
रवि- मंगळ- शनि आप्तेष्टांपासून विभक्त, मूर्ख,अनेकरोगानी ग्रस्त, संपत्तीवान असेलच असे नाही. दुःखी लोभी,अपमानित.रवि-बुध- शनि आप्तेष्ट नसलेला, संपात्तिक स्थिती अगदी, बेताची द्वेषी, व्यसनासक्त, दुष्टाचरणी, कलाद्वेष्टी,धननाशी, कुटील, लहानपणी अतिशय सुंदर ३५ व्या वर्षी विकृतदेही, मस्तकात सतत नीच कार्याचा विचार करण्यात मग्न.
रवि-गुरू- शनि निर्भय किर्तीवान, समाजात नावलौकिक असलेल्या मोठया व्यक्ती संस्थे तर्फे सन्मान, शांत सुस्वभावी सात्विक मात्र चरित्रहीन,दुःखी,शत्रूपीडा.
रवि-शुक्र- शनि किर्तीवान,स्वभावाने उद्धट, चारित्र्याने अतिशय वाईट, नीच रोगाने पीडित, रवि- चंद्र-शनि
(क्रमशः).भाग १३६
संपर्क-9096587586