रवि- शुक्र-शनि- युती किर्तीवान, स्वभावाने उद्धट, चारित्र्याने वाईट, गर्विष्ठ, नीच कार्यरत रोगाने पीडित, लोकतिरस्कारी.रवी-चंद्र-शनि:ही युती ज्योतिषशास्त्रात एक निषेध मानली जाते. जन्मतःच या राशीच्या व्यक्तींना साडेसाती उदरी आलेली असते. या युतीचे पाहिले फळ म्हणजे स्वतः अल्पायु 18 वे वर्ष लागताच या व्यक्ती दीर्घायु होतात. पहिल्या साडेडतीतच माता- पित्याच्या मृत्यूचा योग, जर न जाहला तर 30व्या वर्षी हे लोक श्रीमंत किंवा कफल्लक होतात.
माता-पित्याच्या पश्चयात भाग्योदय होतो. धाडसी, पराक्रमी, संतती, संपत्ती, मान सन्मान, ऐश्वर्य उत्तम असते. स्थावर इस्टेट होते. द्विभार्या योग संभवतो. भटकणारा, मोठे उद्योग करणारा, राजकारणी. हा योग 12,11,10,7,5, 2, या स्थानातच होऊन लग्न अनुकूल असेल तर या व्यक्ती अर्थात स्त्री असो अथवा पुरुष सर्व बाजूने पुढे येतात. या योग केंद्रात 10,7,4,1 तर प्रसंगी पितृ – पश्चात जन्म होतो, अथवा दत्तक जाण्याचा योग येतो.
रवि- मंगळ- शनि ही युती फार मोठी अगम्य युती आहे. या युतीतील व्यक्ती क्रांतिकारक किंवा तेजस्वी साधू होतो. उदात्त विचार, बंधुत्व प्रचार, आचरणशील पण कफल्लक असतात.अशा व्यक्ती सरकारी नोकरी करणाऱ्या आढळतात. जर हा योग 11,10,6,4,3, या स्थानात असेल, सरकारी नोकरी असेल तर अफरातफरीच्या प्रकरणात तुरुंगवास घडतो. 12,6 स्थानात असेल तर नेहमी अपघात . यातच प्रसंगी मृत्यूयोग. सरकार विरुद्ध चळवळ असेल किंवा काही वाईट कृती असेल तर तर फासावर जावे लागते किंवा परागंदा व्हावे लागते. ही युती चतुर्थात होईल तर पित्याला पुत्र एकटाच असतो . पूर्ववयात श्रीमंत उतारवयात दरिद्री. शेवटी बायको मुले विरुद्ध होतात. 10,6,2 सायन्स विषयाकडे जातात.8,4 स्थानातील व्यक्ती सर्जन होतात. बाकीच्या राशीत राजकारणी, मुत्सद्दी, वकील, बॅरिस्टर वगैरे झाल्याचे दिसून येते. काहींचे संसार होताना दिसत नाही. अविवाहित असतात.ह्या व्यक्ती मात्र भांडण- तंट्या पासून अलिप्त असतात.
रवि-बुध- शनी या योगात वाईट फळ एकच आहे ते म्हणजे खोटे बोलणे, खोटे कागद तयार करणे, खोट्या साक्षी देणे, लोकांना फसविणे, चुकीचा सल्ला देणे, लोकांना फसवून इस्टेट मिळविणे. रवि- गुरू- शनि: ही युती ज्योतिष शास्त्रात निरुपयोगी युती आहे. या व्यसक्तीचा संसार कसातरी होतो. पूर्ववयात अत्यंत दरिद्री, आपत्ती वैगरेनी गांजलेले असतात. संतती (क्रमशः) भाग-१३७