मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्य अनलॉक जरी झाले असले तरी राज्यात अद्याप नाट्यगृह चित्रपटगृह बंदच आहे. मात्र, आता ५० टक्क्यांच्या मर्यादेसह ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आज नाट्यक्षेत्रातील काही मान्यवर कलाकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी नाट्यगृह सुरु करा अशी मागणी करण्यात आली.मान्यवरांच्या भेटीनंतर राज्यातील नाट्यगृह ५ नोव्हेंबर पासून सुरु करण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले. तसा आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना तातडीने देण्यात आला आहे.
