सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र 

0

हरिअनंत,नाशिक 
पूर्ववयात सौख्य नाही मात्र म्हातारपणी थोडे मिळते.
रवि- मंगळ-गुरू-शनि : या युतीतील व्यक्ती अतिशय टक्कर देऊन पुढे येतात.जन्माला आल्यावर कदाचित जन्मदात्या पित्याचा मृत्यू  न घडल्यास वडीलोपार्जित इस्टेट नष्ट होते.  पित्याला  आर्थिक, मानसिक, शारीरिक अतोनात त्रास. भाग्योदय फार उशिरा. दोन बायका झसल्या तरी संतती होत नाही.  एक बायको राहिली तर संतती होते.
 
 
 रवि-मंगळ-शुक्र-शनि : हा यो असता वैवाहिक स्थिती फार वाईट, बहूभार्या योग आहे. मोठ- मोठे धंदे होतात. वाहन,चाकर, संतती असते.  विषयी वासना असते. बहिणीचे सौख्य मिळत नाही. यांत्रिक विभागाकडे लक्ष, तसेच शेतीकडेपण असते. पूर्ववयात  दरिद्री, उतारवयात श्रीमंत व सुखी
 
 
रवि-बुध-गुरू- शनि : ही युती 1/ 3/7/10/9/11 या लग्नाला शुभ फळे देते. बाकीच्या लग्नाला अशुभ फळे देते. जन्मापासून शेवटपर्यंत सुखी. कारण वडीलोपार्जित मिळकत असते. सरकारी नोकरीत पुढे येतात. मास्तर, प्रकाशक होतात. बुद्धिमान असतात.  ऐषारामात जीवन घालवतात. 
 
रवि-बुध-गुरू- शनि : या युतीतील व्यक्ती अत्यंत  राजकारणी, धोरणी, मुत्सद्दी, प्रतिपक्षावर मात करणारे, वेदांती, भावाभावांमध्ये उतारवयात कलह. नेहमी उद्योगी. संतती थोडी.  संतती विभक्त राहते. पत्नी घरात असंतोषी. वकिली वृत्ती, थोडीफार इस्टेट होते. भाग्योदय ३६ वर्षांनंतर. ही युती पंचमात सिंह राशीला तंतोतंत पटते. वडील लहानपणी जातात. 
 
रवि-बुध-शुक्र-शनि : आई- वडीलांचे सौख्य कमी, सरकारी नोकरीची शक्यता कमी. इतर नोकरी होते. द्विभार्या योग्य संभवतो. हा योग स्त्री- राशीत असेल तर संतती खूप. जर पुरुष राशीत  असेल तर कमी.
 
रवि-गुरू-शुक्र- शनि- : या योगात कवी, नाटककार, कादंबरीकार असा योग येतो. देशभक्त, मानसन्मान वाढतो. संतती राहत नाही. सरकारी मोठया अधिकाराची जागा मिळते. पत्नीची प्रकृती बरी असत नाही. गल्लीत  ओळखीच्या, जवळच्या  घराच्या आसपासच्या व्यक्तींच्या मनात यांच्या विषयी  काहीतरी गैरसमज असतो.
 
पाच ग्रहा बरोबर शनि असता 
 
रवि-चंद्र-मंगळ-बुध-शनी :अल्पायु, आर्जवी, स्त्रीपुत्ररहित, पैशाचा लोभी, मृत्यूसमयी स्त्री व पुत्र जवळ असत नाही. सुखहीन, धनरहित, विरह सोसणारा. 
 
रवि-चंद्र-मंगळ-गुरू-शनि :लोभी, दुःखी, स्त्रीने सोडलेला, कष्टी, आशाळू प्रिय मित्रांशी रमणारा 
 
रवि-चंद्र-मंगळ-शुक्र-शनि : श्रीमान  सत्ताधीश,कर्तृत्ववान,(क्रमश:) भाग -१४०
Hari Ananat -Shani Shastra
हरिअनंत,नाशिक
संपर्क -9096587586

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.