मुंबई– महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्य अनलॉक जरी झाले असले तरी राज्यात अद्याप नाट्यगृह चित्रपटगृह बंदच आहे. मात्र, आता ५० टक्क्यांच्या मर्यादेसह ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आज नाट्यक्षेत्रातील काही मान्यवर कलाकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी नाट्यगृह सुरु करा अशी मागणी करण्यात आली.मान्यवरांच्या भेटीनंतर राज्यातील नाट्यगृह ५ नोव्हेंबर पासून सुरु करण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले. तसा आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना तातडीने देण्यात आला आहे.
या भेटी प्रसंगी अखिल भारतीय नाट्य परिषद अध्यक्ष नवनाथ मच्छिन्द्र कांबळी, प्रवक्ते मंगेश कदम मराठी नाट्यव्यासायिक निर्माता संघ अध्यक्ष संतोष भरत काणेकर, रंगमंच कामगार संघटना अध्यक्ष किशोर वेल्ले, विजय केंकरे, रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी विजय राणे, आणि ही भेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेणारे श्री. आदेश बांदेकर , श्री. सुबोध भावे. हे उपस्थित होते.
५० टक्क्यांच्या मर्यादेसह नाट्यगृह सुरु करण्याचे आदेश जरी दिले असले तरी रंगकर्मी आणि रसिकप्रेक्षकांना तब्बल दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.