नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९९ तर शहरात ४२ नवे रुग्ण

0

मागील २४ तासात : जिल्ह्यात १०२ कोरोना मुक्त : ३६८ कोरोनाचे संशयित : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६२%
नाशिक – आज नाशिक जिल्ह्यात ९९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात नव्या रुग्णांची संख्या ४२ झाली आहे.तर जिल्ह्यात आज ९७ जण कोरोना मुक्त झाले.आज जिल्ह्यात कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला.आज मात्र २४८ जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे. 
 
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९७.६२ % झाली आहे.आज जवळपास ३६८ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ३ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात ०१ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात ०२ ,मालेगाव महापालिका हद्दीत ० रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
 
सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ४२ तर ग्रामीण भागात ५० मालेगाव मनपा विभागात ०१तर बाह्य ०६ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९८.०१ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण १०७६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ५९३ जण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.
 
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  – नाशिक ग्रामीण मधे ९७.०४ %,नाशिक शहरात ९८.०१ %, मालेगाव मध्ये ९६.८२ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६२ %इतके आहे.
 
 
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- ३
 

नाशिक महानगरपालिका- ०२

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०१

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८५३३

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ३९५४

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०६:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – 

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३४०

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- 

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ५

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १९

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  २४८

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

https://janasthanonline.com/wp-content/uploads/2021/08/AGE-SEX-TEMPLATE-08-AUG-2021.pdf

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.