
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Today’s Horoscope in marathi)
चैत्र शुक्ल एकादशी/द्वादशी. वसंत ऋतू. पराभवनाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राहुकाळ – संध्याकाळी ४.३० ते ६.००
“आज चांगला दिवस आहे”
चंद्रनक्षत्र – आश्लेषा / (दुपारी २.३८ नंतर) मघा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क / (दुपारी २.३८ नंतर) सिंह.(Today’s Horoscope in marathi)
मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)-आज चंद्र चतुर्थ/पंचम स्थानातून भ्रमण करीत आहे. दिवस मिश्र असला तरी चांगल्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात प्रगती होईल. कामात स्पर्धा वाढेल पण यश मिळेल. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)- तृतीय/चतुर्थ चंद्र अनुकूल आहे. घरगुती सुख मिळेल. नवीन वस्तू खरेदी कराल. संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. व्यवसायात प्रगती होईल.
मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा) – द्वितीय/तृतीय चंद्रामुळे प्रवास संभवतो. कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल. मानसिक समाधान मिळेल. वाहन किंवा घरासंबंधित निर्णय घ्याल.
कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो) – आज तुमच्या राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ संभवतो. दुपारनंतर खर्च वाढेल.
सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे) – दुपारनंतर चंद्र तुमच्या राशीत येईल. व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल. नवीन योजना आखाल. मान-सन्मान वाढेल. आवडत्या व्यक्तीची भेट होईल.
कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो) – द्वादश चंद्रामुळे खर्च वाढेल. तरीही काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. प्रवास संभवतो.
तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते) – दुपार नंतर लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. नवीन ओळखी होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु) – दशम चंद्रामुळे कामात यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. व्यवसायात प्रगती होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल.
धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे) – अष्टम/नवम चंद्र अनुकूल आहे. भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल. प्रवास लाभदायक ठरेल.
मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी) – सप्तम/अष्टम चंद्रामुळे थोडा ताण जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्या. अचानक खर्च संभवतो. संयम ठेवल्यास दिवस चांगला जाईल.
कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा) – सप्तम चंद्रामुळे संबंध दृढ होतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल. व्यवसायात भागीदारीत लाभ होईल. नवीन संधी मिळतील.
मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची) – षष्ठ चंद्रामुळे कामात व्यस्तता वाढेल. प्रयत्नांना यश मिळेल. शत्रूंवर विजय मिळवाल. आरोग्य सुधारेल.
विशेष सूचना:
कामदा एकादशीचे व्रत केल्यास पापक्षय होतो व मनोकामना पूर्ण होतात. गंडांत नक्षत्र असल्याने शांती विधी करणे लाभदायक ठरेल
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)


