आजचे राशिभविष्य बुधवार, १ एप्रिल २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Today’s Horoscope in marathi)
चैत्र शुक्ल चतुर्दशी/पौर्णिमा. वसंत ऋतू. पराभव नाम सनावत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज वृद्धी योग आहे”
आज सकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे.
*हनुमान जयंतीचा उपवास.* सर्व देवांना दवणा वाहणे.
चंद्र नक्षत्र – उत्तरा / (दुपारी ४.१८ नंतर) हस्त.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या (वृद्धी योग, विष्टी करण शांती) (Today’s Horoscope in marathi)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)-षष्ठ स्थानी चंद्र आहे. जोडीदारासोबत वेळ घालवाल. नवीन ओळखी होतील. मात्र शनीच्या प्रभावामुळे काही मतभेद संभवतात. संयम ठेवा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)-व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक आवक वाढेल. महिलांकडून लाभ होतील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)-जमीन, घर किंवा मालमत्तेच्या व्यवहारात यश मिळेल. अधिकारात वाढ होईल. मात्र निर्णय घेताना सावध राहा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)-कलाकार, गायक, अभिनेते यांना उत्तम दिवस आहे. नवीन संधी मिळतील. काही वाद निर्माण होऊ शकतात, पण त्यात विजय मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)-प्रेम आणि आनंदाचा दिवस आहे. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवाल. खर्च वाढू शकतो.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)-तुमच्या राशीत चंद्र असल्याने व्यक्तिमत्व उजळून निघेल. मात्र शनी प्रतियुतीमुळे मानसिक ताण जाणवेल. शांतता राखा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)-मन अस्वस्थ राहील. चिडचिड वाढू शकते. अध्यात्म आणि उपासना याकडे वळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)-स्वतःच्या व्यक्तिमत्वावर खर्च कराल. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. मात्र खर्च वाढेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)-ग्रहमान अनुकूल आहे. आनंदाचा दिवस आहे. नवीन संबंध जुळतील. कला आणि संगीत यामध्ये रस वाढेल.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)-आर्थिक लाभ होईल. कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)-अष्टम स्थानी चंद्र असला तरी नैराश्य काहीसे कमी होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी मिळेल.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)-जुने व्यवहार पूर्ण करावे लागतील. आर्थिक बाबतीत सावध राहा. गैरसमज टाळण्यासाठी संयम ठेवा.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!