आजचे राशिभविष्य रविवार,२८ मे २०२३  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
जेष्ठ शुक्ल अष्टमी, ग्रीष्म ऋतू, उत्तरायण, शोभननाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज  चांगला दिवस आहे” नक्षत्र: पूर्वा फाल्गुना. *दुर्गाष्टमी* 
आज जन्मलेल्या बाळाची राशी :- सिंह. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) बौद्धिक क्षेत्रात अग्रेसर रहाल.छोटे प्रवास घडतील.अचानक लाभ होऊ शकतात.वारसा हक्काचे कामात अडथळे येतील.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) ऐच्छिक खर्च कराल.गायकांना यश लाभेल. घरात छोटीशी मैफिल होईल.इतरांना मेजवानी द्याल.कामाच्या ठिकाणी मर्यादाभंग होऊ शकतो.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा)अति उत्तम दिवस आहे.आर्थिक प्रगती होईल.मन आनंदी राहील.अचानक धनलाभ होऊ शकतो.आरोग्याची मात्र काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरीत बुद्धी चातुर्य दाखवाल.महिला वरिष्ठ कामाची तारीफ करतील.स्वतःच्या चैनीवर खर्च कराल.सरकारी कामात लक्ष द्यावे लागेल.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मन प्रसन्न राहील.मित्र मंडळी सोबत मौज कराल.प्रवासातून आनंद मिळेल.सर्व प्रकारचे लाभ मिळतील.नोकरीच्या कामातून सवड काढा अन्यथा पत्नी नाराज होऊ शकेल.
कन्या:-(टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे.नोकरीच्या ठिकाणी सहकारी उत्तमपणे मदत करतील.सुखद अनुभव येतील.खर्चात वाढ होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पत्नीसाठी आजचा दिवस राखून ठेवण्यास हरकत नाही.कौटुंबिक सौख्य लाभेल.आनंदी राहाल.छोटी सहल घडेल.गूढ बाबींचे आकर्षण वाटेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नोकरी,व्यवसायात यश मिळेल.शत्रू पराभूत होतील. स्पर्धेत यश मिळेल.नवीन व्यवसाय सुरू कराल.घरात कुरबुरी होऊ शकतात.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) वाहन सुख लाभेल.वास्तु मध्ये मोठे बदल कराल. खनिज संबंधित व्यवसायात भरघोस यश मिळेल.उजव्या हाताची काळजी घ्या.
मकर:-(भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राहत्या जागेचे प्रश्न सुटतील.शेजाऱ्यांशी संवाद होईल. लॉटरीत यश मिळू शकते.इष्ट देवतांची उपासना करा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल.भागीदारी व्यवसायात यश लाभेल.मित्रांकडून मदत मिळेल.लेखकांना यश.प्रेमात प्रगती होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक प्रगतीसाठी तुमची बुद्धिमत्ता उपयोगी पडेल.अचानक लाभ संभवतात.वाहन सुख लाभेल.अति धाडस नको.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.