ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
कार्तिक कृष्ण दशमी. शरद ऋतू, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज संध्याकाळी ५.०० पर्यंत चांगला दिवस आहे”
चंद्रनक्षत्र: उत्तरा फाल्गुना
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अधिकाराचा लाभ मिळेल. नफा वाढेल. उत्तम दिवस आहे.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) भागीदारी व्यवसायात उत्तम फायदा होईल. यश आणि कीर्ती मिळेल. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संवाद कौशल्य कामास येईल विक्री व्यवसायात वाढ होईल. बौद्धिक आनंद मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामानिमित्त भ्रमंती होईल. बोलण्यातून गैरसमज टाळा. मते मतांतरे होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) चातुर्य आणि अधिकार यांचा संगम होईल. नवीन झेप घ्याल. वेळेचा सदुपयोग कराल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम आरोग्य लाभेल. छोटी सहल कराल. मन आनंदी राहील. हवाहवासा संदेश येईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू, ते) सूर्य उपासना करा. व्यायामाची गरज आहे. मनाची शक्ती वाढवा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कष्टाला आनंदाची जोड मिळेल. कामात मन रमेल. प्रसन्नता वाढेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) व्यवसायात इतरांना गृहीत धरू नका. प्रतिष्ठा पणाला लागेल. भौतिक सुखांचा अतिरेक टाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सूचक घटना घडतील. मानसिक स्वास्थ्य लाभण्यासाठी उपासना आणि ध्यानधारणा महत्वाची आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. दगदग वाढेल. मात्र कामे मनासारखी होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) जेष्ठ व्यक्तींकडून लाभ मिळतील. अडचणी दूर होतील. प्रश्न सुटतील. प्रेमात यश मिळेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)