ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ शुक्ल सप्तमी. शिशिर ऋतू.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज सकाळी ९.०० पर्यंत चांगला दिवस *रथ सप्तमी, भीष्म अष्टमी, जागतिक सूर्यनमस्कार दिवस* आहे”
चंद्र नक्षत्र – अश्विनी (केतू)(संध्याकाळी ७.०६ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-विचारपूर्वक निर्णय घ्या. संवादातून लाभ होतील. प्रवास कार्यसाधक होतील. भौतिक सुखे लाभतील.
वृषभ:-भय वाटेल. आरोग्य सांभाळा. मानसिक शांततेची गरज भासेल. विश्रांती घ्या.काही सुखद अनुभव येतील. इलेक्ट्रॉनिक वस्तू सांभाळा.
मिथुन:-उत्तम आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. कठोर भूमिका घ्याल.व्यवसायात दबदबा निर्माण होईल.
कर्क:- धाडसी निर्णय नकोत. संमिश्र दिवस आहे. काळजीपूर्वक निर्णय घ्या.वरिष्ठ निवड जबाबदारी टाकतील.
सिंह:-महत्वाची कामे आज नकोत. घरातील जेष्ठ व्यक्तींची काळजी वाटेल. प्रवासात त्रास जाणवेल.
कन्या:-दगदग जाणवेल. मन अशांत राहील. पोटाचे विकार होऊ शकतात. रक्तदाब सांभाळा.
तुळ:- विरोधक पराभूत होतील. नवीन कल्पना सुचतील. वक्तृत्व बहरेल. आरोग्य सांभाळा.
वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अचानक धनलाभ होतील. नवीन संधी चालून येतील. मन मोकळे कराल.
धनु:- संमिश्र दिवस आहे. धाडस अंगाशी येईल. काळजी वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. मनाला आवरा.
मकर:- वाद विवाद टाळा. इतरांना समजून घ्या. राजकीय क्षेत्रात जपून पावले टाका.जमीन व्यवहारातून लाभ होईल.
कुंभ:- सौख्याचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. प्रगतीचा वेग मात्र संथ राहील.
मीन:- इतरांच्या चुका काढू नका. नमते घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
