ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन कृष्ण पंचमी. शिशिर ऋतू. उत्तरायण.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज अनिष्ट दिवस *रंगपंचमी*
चंद्र नक्षत्र – स्वाती/विशाखा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- कामाचा उत्साह वाढेल. यश मिळेल. स्पर्धा जिंकली जाईल.
वृषभ:- उत्तम लाभाचा दिवस आहे. संवाद कौशल्य कामास येईल. मात्र जामीन राहू नका.
मिथुन:- कामाच्या ठिकाणी यश मिळेल. नवीन ओळखी होतील. विक्री व्यवसायात वाढ होईल.
कर्क:– जोडीदाराशी संवाद साधा. संशयकल्लोळ टाळा. आज महत्वाची कामे नकोत.
सिंह:- नफा वाढेल. कामे मार्गी लागतील. महत्वाच्या चर्चा होतील.
कन्या:- दिलेला शब्द पाळला जाईल. कुटुंबिक सुख मिळेल. धन वाढेल.
तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अधिकाराचा योग्य उपयोग कराल. प्रश्न सुटतील.
वृश्चिक:– आराम करण्याचा दिवस आहे. महत्वाचे करार नकोत. कामात अडथळे येतील.
धनु:- मन प्रसन्न राहील नवीन प्रयोग कराल. उत्साहात वाढ होईल.
मकर:- कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येईल. योग्य निर्णय घ्याल. कल्पकता दाखवाल.
कुंभ:- छोटे प्रवास घडतील. मौज कराल. व्यसने नकोत.
मीन:- गैरसमज टाळा. मोजके बोला. अनोळखी व्यक्तीकडून फसवणूक होऊ शकते.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
