आजचे राशिभविष्य गुरुवार, १६ फेब्रुवारी २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ कृष्ण एकादशी. शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज चांगला दिवस आहे” *विजया (स्मार्त) एकादशी*
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु.
चंद्र नक्षत्र: मूळ
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवास घडतील. येणी रेंगाळतील. मेहनत वाढवावी लागेल.
वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्य सांभाळा. वाहने जपून चालवा. शेअर बाजारात अपयश येईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रेमात यश मिळेल. शुभ समाचार समजतील. भ्रमंती घडेल. प्रवास कार्यसाधक होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभाचा दिवस आहे. मौल्यवान खरेदी होईल. अचानक लाभ होतील. आरोग्य सांभाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. अपत्य संबंधित शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मानसिक सौख्य लाभेल. स्पष्ट भूमिका घ्याल. कोर्ट कामात प्रगती होईल. वाहन जपून चालवा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. व्यवसायात वाढ होईल. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कलाकारांना यश मिळेल. वक्तृत्व बहरेल. कौटुंबिक सुख लाभेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय होतील. मैत्र मैत्रिणी भेटतील. मेजवानी मिळेल. येणी वसूल होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आरोग्य सांभाळा. खर्चात वाढ होईल. अपमानाचे प्रसंग येतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. आनंदी राहाल. वादविवादात यश मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अधिकारात वाढ होईल. मात्र जबाबदारी वाढेल. वरिष्ठ नाराज होतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!