ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख कृष्ण चतुर्दशी.वसंत ऋतू.शोभन नाम संवत्सर.
राहू काळ -दुपारी १.३० ते दुपारी ३.००
चंद्र नक्षत्र -अश्विनी
वर्ज्य दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -मेष.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-आनंदी दिवस आहे. मौल्यवान खरेदी कराल. छोटे प्रवास घडतील. मात्र वेगावर नियंत्रण ठेवा.
वृषभ:-मनाला अस्वास्थ्य जाणवेल. गूढ अनुभव येतील.गायकांना यश मिळेल.वक्तृत्व चमकेल.
मिथुन:-मनाला उभारी देणारा दिवस आहे. व्यक्तिमत्व उजळून निघेल.सन्मान मिळेल.
कर्क:-स्वतःसाठी खर्च कराल. नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास घडतील.कामाच्या ठिकाणी काहीसे खटके उडण्याची शक्यता आहे.
सिंह:-तीर्थयात्रा घडेल.मौल्यवान खरेदी होईल.भिन्न लिंगी व्यक्ती कडून लाभ होतील.प्रवासात काळजी घ्या.
कन्या:-सबुरीने वाटचाल केली पाहिजे.वाहन चालवताना काळजी घ्या.पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल.कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येईल.
तुळ:-परदेश गमनाचे किंवा सहलीचे योग् आहेत.बुद्धिमत्ता वापराल.पत्नीशी वादविवाद संभवतात.
वृश्चिक:-आर्थिक लाभ होतील.व्यवसायात भरभराट होईल.मात्र एखादा कटू अनुभव येऊ शकतो.स्त्री धनात वाढ होईल.
धनु:-समाजात मान सन्मान लाभतील.पत्नीकडून लाभ होतील.धाडसी निर्णय घेताना काळजी घ्या.अनोळखी स्त्रियांपासून सावध रहा.
मकर:-कनिष्ठ लोकांकडून लाभ होतील.अचानक धनलाभ होईल.गृहकलह होऊ शकतो.घरातील उष्णते संबंधीत उपकरणांची काळजी घ्या.
कुंभ:-आर्थिक लाभाचा दिवस आहे. विवाह इच्छुकांना खूषखबर मिळेल.घरात राहणे पसंत कराल.भावंडांशी वाद टाळा.
मीन:-घराभोवती बागबगीचा यात वेळ घालवणे आवडेल. मनासारखा दिवस व्यतीत कराल.मात्र काही कौटुंबिक कटकटींचा सामना करावा लागू शकतो.
( कुंडलीवरून करियर,लग्न,व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)
