ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन, शुक्लपक्ष, नवमी, दक्षिणायन, शरद ऋतू,
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
चंद्रनक्षत्र:- ‘उत्तराषाढा’ (सकाळी ९.३५ पर्यंत) चंद्र राशी मकर
आज उत्तम दिवस आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- कामाच्या ठिकाणी दबदबा वाढेल. मनासारखे व्यावसायिक यश मिळेल. अधिकार वाढतील. कार्य सिद्धीस जाईल.
वृषभ:- अकल्पित धनलाभ होऊ शकतो. येणी वसूल होतील. आर्थिक तजवीज होईल. वारसा हक्काने लाभ होतील.
मिथुन:- आज आरोग्य सांभाळा. दगदग सहन होणार नाही. प्रवासात काळजी घ्या.
कर्क:- हितशत्रू उघड होतील. विनाकारण वाद टाळा. घरातील व्यक्तींना बिश्वासात घ्या.
सिंह:- विजयी घोडदौड चालू राहील. काही गूढ कोडी अचानक सुटतील. योग्य मार्ग दिसेल.
कन्या:- धाडसी निर्णय घेण्याची वेळ आली आहे. घोळ घालू नका अन्यथा संधी हातून सुटून जातील.
तुळ:- प्रतिष्ठा वाढेल. स्वप्ने साकार होतील. मान सन्मान मिळतील. गृह कलह मात्र टाळा.
वृश्चिक:- मनस्वास्थ्य लाभेल. बौद्धिक चमक दाखवाल. लेखनात यश मिळेल. छोटे प्रवास घडतील.
धनु:- स्पष्ट बोलणे टाळा. अधकाराचा गैरवापर होऊ देऊ नका. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
मकर:- आत्मविश्वास वाढेल. राजकीय यश प्राप्त होईल. आर्थिक क्षेत्रात वाटचाल चांगली चालू आहे.
कुंभ:- बारावा चंद्र आणि सोबत शनी आहेत. चिंता निर्माण होतील. मन अस्वास्थ राहील.
मीन:- अनुकूल शनी आणि चंद्र तुम्हाला सौख्य प्रदान करतील. प्रगतीकडे वाटचाल होईल. संधी चालून येतील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)