नाशिक – पालकमंत्री ना.छगनराव भुजबळ यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस दि.१५ ऑक्टोबर २०२१ रोजी साजरा होत असून असून त्यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक कार्यक्रमांचे करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील तालुका व प्रभागवार ना. छगनराव भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यात रक्तदान शिबिरे, शाखा उदघाटने, रोगनिदान शिबिरे, महिलांसाठी कॅन्सर व अन्य रोगनिदान शिबिरे, मुक्या पाळीव जनावरांचे रोगनिदान शिबीरे, जेष्ठ नागरिक मेळावे, नोकरी विषयक मार्गदर्शन शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, अनाथ मुलांना दत्तक घेणे, संघर्ष योद्धा व्याख्यान मालिका, चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार, रेशन कार्ड शिबीरे, नेत्र व मधुमेह तपासणी शिबिरे, फळे, मिठाई वाटप आदि भरगच्च कार्यक्रम जिल्हाभर आयोजित करण्यात आले आहे.