ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्रशुक्ल चतुर्थी. वसंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस आहे”
*विनायक चतुर्थी अंगारकी योग* गणपतीला दवणा आणि लाडूचा नैवेद्य समर्पित करणे.
चंद्रनक्षत्र – कृतिका (दुपारी ४.५२ पर्यंत) प्रीती योग सकाळी ७.५८ पर्यंत. नंतर आयुष्यमा योग.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) प्रतिष्ठा वाढेल. मान सन्मान मिळतील. सुखाची अनुभूती मिळेल. कलाकारांना यश मिळेल. भौतिक सुखात मात्र कमी येईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. काही अपमानाचे प्रसंग येऊ शकतात. संयम ठेवा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात वाढ होणार आहे. अधिकाराचा गैरवापर टाळा. मेहनत करा. विश्र्नाती घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम लाभाचा दिवस आहे. मान सन्मान मिळतील. अधिकारात वाढ होईल. व्यसने टाळा. गुंतवणूक करताना अधिक मोह नको.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्साह वाढेल. जबाबदारीच्या ठिकाणी नेमणूक होईल. कामे मार्गी लागतील. स्पर्धा जाणवेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. महत्वाची कामे आज नकोत. संयम बाळगा. घाईकरू नका. आज योग्य वेळ नाही.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे आज नकोत. काही प्रश्न सुटतील. उधार देणे टाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक कालावधी आहे. कठोर निर्णय घ्याल. आरोग्य मात्र सांभाळा. वाहने जपून चालवा. रूढी आणि परंपरा पालन करा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. विजयी व्हाल. कुटुंबात मतभेद जाणवतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मनासारखी कामे होतील. सौख्य लाभेल. शिक्षण संबंधित निर्णय होतील. कमी बोलणे हिताचे आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) शुभ दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. वर्चस्व राहील. मौल्यवान खरेदी होईल. पाळीव प्राण्यांची काळजी घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लाभदायक दिवस आहे. दबदबा वाढेल. सन्मान होईल. यश मिळेल. कीर्ती पसरेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)