ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अधिक श्रावण शुक्ल प्रतिपदा. वर्षा ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज करी दिन आहे.”मला/अधिक श्रावण मासारंभ
चंद्र नक्षत्र -पुष्य.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -कर्क.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) वास्तू संबंधित प्रश्न सुटतील. मात्र खर्च वाढेल. व्यसने टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्रगती उत्तम होईल. जलाशय जवळ भाग्योदय होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नोकरीत काही सुखद अनुभव येतील. आरोग्य मात्र सांभाळा. कामाचा ताण वाढेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कुटुंबासोबत सहल घडेल. जलपर्यटन घडेल. प्रशासकीय कामे रेंगाळतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. वाळवंटात मृगजळ भेटावे तसे अनुभव येतील. पर्जन्याचा आनंद घ्याल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल दिवस आहे.भरघोस लाभ होतील. चाकोरी सोडून निर्णय घ्याल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामानिमित्त नवीन ओळखी होतील.वरिष्ठांची मर्जी सांभाळा. पाण्यापासून धोका संभवतो.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) धाडस अंगाशी येईल. अति उत्साह टाळा. प्रवासात काळजी घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) बोलण्यातून अर्थचा अनर्थ होऊ शकतो.सामाजिक कार्यातून तणाव निर्माण होऊ शकतो.मौन आवश्यक आहे.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रवास घडतील. विनाकारण दोषारोप होतील. आत्ममग्न व्हाल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) लाभाचा दिवस आहे. धाडसी निर्णय घ्याल. शब्दास मान मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अपत्यांशी संवाद साधा. सावध पवित्र घ्या. प्रगतीचा वेग मर्यादित ठेवा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)