आजचे राशिभविष्य मंगळवार,५ सप्टेंबर २०२३  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
श्रावण कृष्ण षष्ठी. वर्षा  ऋतू. 
“आज सकाळी ९.०० पर्यंत चांगला दिवस आहे” 
नक्षत्र – भरणी. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष/वृषभ.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  शब्दाला मान मिळेल. येणी वसूल होतील. व्यसने टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) शुभ दिवस आहे. कामे मार्गि लागतील.  पाणथळ जागेजवल भाग्योदय होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. पूर्वार्ध अनुकूल आहे. पाण्यापासून धोका संभवतो.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तरार्ध चांगला आहे. आनंदी राहाल. आध्यत्मिक लाभ मिळतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. अचानक लाभाचे योग आहेत. वेळ दवडू नका.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दुपारनंतर कामाला गती येईल. संयम बाळगणे आवश्यक आहे. सकाळी अपघाताचे भय आहे.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  विश्रांतीची गरज भासेल. मन उदास राहू शकते. ध्यानधारणा करा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. उत्तरार्ध कौटुंबिक कामासाठी राखून ठेवावा लागेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अंदाज अचूक येणार आहेत. सकाळच्या वेळेत अचानक धनलाभाचे योग आहेत.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) भ्रमंती घडेल. राहत्या  घराच्या कामासाठी वेळ द्यावा लागेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) लेखकांना चांगला दिवस आहे. प्रकाशन व्यावसायिकांना यशदायी कालावधी आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तरार्ध अधिक चांगला आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. मेजवानी घडेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!