ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष शुक्ल पंचमी, हेमंत ऋतू, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज चंद्र श्रवण नक्षत्रात आहे.
आज उत्तम दिवस आहे. नागपूजन, नागदिवे करावेत. घबाड रात्री १०.४० नंतर.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- उद्योग व्यवसाय तसेच कामाच्या ठिकाणी राजकारणाचा अनुभव येईल मात्र सरशी तुमचीच होईल. वरिष्ठ खुश राहतील.
वृषभ:- पित्याकडून लाभ होतील. वारसा हक्काने मदत मिळेल. दूरचे नातेवाईक भेटतील. उच्च शिक्षण तसेच दूरचे प्रवास यात अडचणी येतील.
मिथुन:- विनाकारण मनस्ताप होतील. संबंध नसलेल्या प्रकरणात गोवले जाल. शक्यतो आराम करा.
कर्क:- योग्य सल्ला मिळेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नवीन स्वतंत्र जोडधंदा सुरू कराल.
सिंह:- अधिकाराचा सदुपयोग कराल. सरकारी कामातून लाभ होतील. आर्थिक उन्नती होईल.
कन्या:-जोखीम स्वीकारून व्यवसाय कराल. त्यात माफक यश मिळेल. शत्रू पराभूत होतील.
तुळ:- गृहकलह होऊ शकतो. शक्यतो नमते घ्या. घराच्या आजूबाजूने त्रास होऊ शकतो.
वृश्चिक:- आर्थिक उलाढाल चांगली राहील. घरात मतभेद होतील. नात्यात गैरसमज निर्माण होतील.
धनु:- दबदबा वाढेल. शब्दावर व्यवहार होतील. आर्थिक बाजू मात्र जरा कमकवूत राहील. कुटुंबात कलह टाळा.
मकर:- आत्मविश्वास कमी होईल. प्रतिष्टा वाढेल. राजकीय यश प्राप्त होईल. सरकारी पद मिळेल.
कुंभ:- मन प्रसन्न राहील. स्वतःसाठी खर्च कराल. आर्थिक नियोजन चुकू शकेल.
मीन:- मनासारखी कामे पार पडतील. कामाचा वेग वाढेल. नवीन मार्ग निर्माण होतील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)