तामिळनाडूमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलीकॉप्टर कोसळले 

११ जणांचे मृतदेह आढळले ; स्थानिकांची माहिती

0

तामिळनाडू – कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले असून हेलिकॉप्टरमध्ये भारतीय सैन्याच्या तिन्ही दालांचे प्रमुख बिपीन रावत यांच्यासह जवळपास ९ ते १४ जण होते,हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, आणि रावत यांची पत्नी मधुरीका रावतही होत्या. हे हेलिकॉप्टर हवाई दलाच्या तळावरून कुन्नूरकडे जात होतं. हे हेलिकॉप्टर कोइम्बतूर आणि सुलूर दरम्यान जंगलात कोसळल्याची माहिती आहे.हवाई दलाचे हे Mi-17V5 हेलिकॉप्टर होते.

वेलिंगटन आर्मी सेंटर जवळ ही घटना आहे. ११ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत अशी स्थनिकांनी माहिती दिली आहे.पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. निलगिरी पर्वत रांगामध्ये आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली आहे. इतरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सीडीएस बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या लोकसभेत या घटनेची माहिती देणार असल्याचं सांगण्यात येतंय.तसेच हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे घटनास्थळाला भेट देणार. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन घटनास्थळाला भेट देणार आहेत.ही दुर्घटना कशी घडली? याची चौकशी करण्यासाठी तामिळनाडू सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

अपघातग्रस्त हॅलिकॉप्टरमध्ये कोण कोण होत ?

सीडीएस बिपीन रावत मधुलिका रावत ब्रिगेडियर एल. एस. लिड्डरलेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंगगुरुसेवक सिंग जितेंद्र कुमार विवेक कुमार बी. साई तेजा

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.