विशालने सांगितले घरातले सगळ्यात मोठे gossip !

का धरले जयने आदिशचे पाय ?

0

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सदस्य सांगणार आहेत काही गुपितं. विशालने सांगितले विकास, सोनाली आणि मीनल यांच्याबद्दल काहीतरी खास. विशालचा आज वेगळाच अंदाज दिसून येणार आहे. हुकूमशाह यांच्यासमोर आपले मत व्यक्त करताना तो बिग बॉस मराठीच्या घरातील काही सदस्यांची गुपितं देखील सांगणार आहे.

विशालचे म्हणणे आहे, या घरात अजून एक आहे महारथी, जो स्वत:ला बोलण्याचा बादशाह समजतो आहे तो म्हणजे आमचा One and Only विकास पाटील. आता हे इतक मोठं gossip नाहीये पण तरी महत्वाच आहे… ते gossip आहे, सोनाली आणि मीनलबद्दल ते gossip… ते असं आहे की… सगळ्यांना वाटते जी महाराष्ट्राची वाघिण आहे, ती मीनल शाह त्यांच्याबद्दल हे gossip आहे, की विकास पाटील म्हंटले की आपल्याला मीनलच बी पत्ता पण कट करायला लागतो. हे ऐकून सगळ्यांनाच धक्काच बसला. तो पुढे म्हणाला, तर मला हे म्हणायचा आहे की, जे बाकीचे प्लेयर आहेतं त्यांनी कृपया सावध राहा, कारण कधी पण पत्ता कट होऊ शकतो.

का धरले जयने आदिशचे पाय ?

बिग बॉस मराठीच्या घराच्या सुरू असलेल्या साप्ताहिक कार्यामध्ये सदस्यांच्या संयमची कसोटी लागणार आहे. ज्या सदस्याच्या विरोधात खेळले त्याचे पाय देखील धरण्याची वेळ येणार आहे. कारण घरात आलेले नवे सदस्य आता फक्त सदस्य नसून लिलिपुट नगराचे हुकूमशहा आहेत आणि बाकीचे ८ सदस्य जनता. त्यामुळे हुकूमशहाच्या आदेशाचे पालन करणे प्रजेस बंधनकारक असणार आहे. याचमुळे कदाचित जयला आदिशच्या पायाजवळ बसावे लागले आहे तितकेच नसून त्याची स्तुति देखील करताना जय दिसणार आहे. आता हा टास्कचा एक बहग आहे की तो खरंच करत आहे हे आजच्या भागामध्ये कळेलच.

जय म्हणताना दिसणार आहे, सर्वगुण संपन्न खेळाडू होते आणि अजूनही आहेत. आणि ते deserve करत होतो म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. ते अतिशय उत्तमरीत्या पार पाडतात प्रत्येक कार्य मी बघत आलो आहे. मग ते भोपळयाचे कार्य असो… त्यांच्याबरोबर खेळताना एक वेगळीच ऊर्जा असायची, मज्जा आली खेळताना. बारा आठवडे झाले पण ज्यावेळेस आदिश घरामध्ये होते तो क्षण मी कधीच विसरू शकतं नाही. कारण, आदिश याने संपूर्ण घराला हलवून सोडलं होतं… आणि हे कौतुक असेच सुरू राहिले.

सोनाली आणि गायत्रीला खावी लागणार कारली !

Big Boss Marathi 3

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल साप्ताहिक कार्य सुरू झाले. घराचे रूपांतर लिलिपुट नगरात करण्यात आले आणि या नगरचे हुकूमशहा घरामध्ये आलेले नवे तीन सदस्य आहेत असे बिग बॉस यांनी जाहीर केले. म्हणजेच स्नेहा, आदिश आणि तृप्तीताई. हे हुकूमशहा सदस्यांना विविध टास्क देणार असून सदस्यांना ते पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. बघूया हुकूमशहांनी दिलेले टास्क हे सदस्य पूर्ण करू शकतील ? काय strategy असेल त्यांची या कार्यामागे ? कारण या टास्कअंती घराला मिळणार आहेत कॅप्टन पदाचे दोन उमेदवार आणि त्या बरोबर येणारी उमेदवारी अत्यंत महत्वाची असणार आहे यात शंका नाही.

कार्यामध्ये आज सोनाली आणि गायत्रीला खावी लागणार आहेत कारली आणि ते खात असताना विचित्र तोंड करण्यास मनाई आहे आणि तसेच ते हात न लावता खायची आहेत. बघूया या दोघी हे कार्य कसे पार पाडतील… तृप्तीताईंनी सोनालीला कार्यामधून बाद केले आणि तिला उठाबश्या काढण्याची शिक्षा दिली.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.