सलग दुसऱ्यादिवशी उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी 

कायदा समान पाहिजे.मला आहे तसाच कायदा मोदी,शाह आणि सत्तेतील तिघांनाही आहे.त्यांच्याही बॅगा तपासल्या पाहिजे.

0

Uddhav Thackeray:राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला रंग भरला आहे.महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार असून निवडणूक यंत्रणाही अलर्ट झाली आहे.पोलीस यंत्रणेसह निवडणूक आयोगाचे कर्मचारीही गस्त घालत आहेत. अशातत शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची यांची सलग दुसऱ्या दिवशी बॅग तपासण्यात आली आहे. औसा येथील हेलीपॅडवर ही तपासणी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकरदेखील होते.काल उद्धव ठाकरे अन् मिलिंद नार्वेकरांच्या बॅगांची वणी हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली. यावर उद्धव ठाकरे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, बॅग तपासायला हरकत नाही. कायदा समान पाहिजे. मला आहे तसाच कायदा मोदी, शाह आणि सत्तेतील तिघांनाही आहे.मोदी पंतप्रधान आणि शाह गृहमंत्री म्हणून येत असतील तर चूक आहे. कारण ते संविधानाने बसले आहेत. माझ्याप्रमाणे त्यांच्या बॅगा तपासल्या पाहिजे. मोदी आणि शाह यांच्या बॅगा जाताना तपासा. कारण ते महाराष्ट्र लुटून नेत आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी मोदी, शाह आणि भाजपवर केला. यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रातील ठाकरे ठाकरे गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारासाठी जात असताना वणी हेलिपॅडवर जात असतानाच उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगा तपासल्या आणि ठाकरेंनी यावर संताप व्यक्त केला.

दरम्यान,यावर बोलताना ठाकरे म्हणाले, मी संतापलो नव्हतो. त्यांनी त्यांचं काम केलं. मी माझं काम केलं.जो अधिकार त्यांना आहे तो मलाही आहे. तुम्ही आम्ही सारखे आहोत. तुम्ही कुणाला तरी मते देता ना. तुम्ही मत देता म्हणजे कोणत्या तरी पक्षाचा आहे. मी मतदार म्हणून माझी तपासणी करता तुमची का नाही करायची. प्रचारक येतात. ते सोलापूर आणि पुण्यात आहे. मोदी नरेंद्र मोदी म्हणून येता की पंतप्रधान म्हणून येतात. ते येतात त्यांना एअरपोर्ट बंद केला जातो. पंतप्रधान आहात तर पक्षाचा प्रचार करू नये. त्यांची बॅग का तपासत नाही. माझ्यावर संशय व्यक्त केला. तर त्यांच्यावर का नाही?असा सवाल ठाकरेंनी केला.

सोमवारी यवतमाळ जिल्ह्यातील वणी मतदारसंघात प्रचारासाठी गेल्यानंतर हेलिपॅडवरच ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर आज औसा येथे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची बॅग तपासणी करण्यात आली आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.