देशात सप्टेंबर पासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात ?

0

नवी दिल्ली – तिसऱ्या लाटेची शक्यता यामुळे भारतातही लहान मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे सप्टेंबरपासून लहानमुलांच्या लसीकरणाला सुरुवात होऊ शकते.असे संकेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिले आहे.देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण एक महत्वपूर्ण पाऊल ठरु शकते. गुलेरिया यांनी पुढे असे म्हटले की, झायडल कॅडिलाने ट्रायल केले आहे.आणि सध्या ते अपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहेत. भारत बायोटेकची कोवॅक्सिन ट्रायल सुद्धा लहान मुलांवर ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत पूर्ण होऊ शकते.डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.

२०२१ च्या अखेर पर्यंत १८ वर्षावरील सर्वाना कोरोनावरील लस मिळाली पाहिजे असा केंद्रसरकारचा विचार आहे.परंतु यासाठी.देशात दर दिवशी जवळपास १ कोटी लस द्यावी लागणार आहे.परंतु सध्या दिवसाला फक्त ४०-५० लाख कोरोनाची लस नागरिकांना दिली जात आहे.दरम्यान, देशात लहान मुलांच्या लसीकरणाला अद्याप तरी परवानगी देण्यात आलेली नाही आहे .अनेक देशांमध्ये आपातकालीन मंजुरी देण्यात आली आहे.परंतु, भारतात आतापर्यंत लहान मुलांच्या लसीकरणाला मंजुरी दिलेली नाही.

भारतात लहान मुलांच्या लसीकरणासाठी स्वदेशी लसीची गरज आहे. त्यामुळे भारत बायोटेक आणि झायडल कॅडिलाची लस अत्यंत आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.त्याचप्रमाणे फायझरची लसही लहान मुलांच्या लसीकरणासाठी महत्त्वाची ठरू शकते. परंतु, आपल्याकडील लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपल्याकडे स्वदेशी लस असणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की, सप्टेंबरपर्यंत लहान मुलांसाठी अनेक लसी आपल्या देशात उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.