मोठी बातमी !वैष्णवीचे नको ते चॅट आम्ही पकडले हगवणे कुटुंबाच्या वकिलाचा कोर्टात धक्कादायक दावा

"चार कानाखाली म्हणजे छळ नाही" – वकिलांचा संतापजनक सवाल,आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ (व्हिडीओ बघा)

1

पुणे, २८ मे २०२५ – Vaishnavi Hagawane Suicide Case पुण्यातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात आज न्यायालयात झालेल्या सुनावणीत अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या. अटक आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोपींच्या वकिलांनी कोर्टात केलेले वक्तव्य आणि युक्तिवाद मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

वैष्णवीच्या चारित्र्यावर आरोप; “नको ते चॅट” कोर्टात उघड
हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान वैष्णवीचे “नको ते चॅट” आम्ही पकडले असल्याचा दावा केला. तिचे एका व्यक्तीसोबत असलेले खासगी संवाद, तिच्या आत्महत्येचा कल आणि पूर्वी केलेल्या आत्महत्येचे प्रयत्न कोर्टात मांडण्यात आले. “रॅट पॉइझन खाल्ले, गाडीतून उडी मारली” असे दावे देखील करण्यात आले.

“चार कानाखाली म्हणजे छळ नाही” – वकिलांचा संतापजनक सवाल ( Vaishnavi Hagawane Suicide Case)
वैष्णवीला प्लॅस्टिकच्या छडीनं मारणं हत्यार वापरणं ठरतं का? चार कानाखाली मारणं छळ म्हणावा का? असे प्रश्न उपस्थित करत आरोपींच्या बाजूने वकिलांनी युक्तिवाद केला.

आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
न्यायालयाने वैष्णवीचा नवरा शशांक, आई लता आणि नणंद करिश्मा यांची एक दिवस आणि सासरे राजेंद्र व सुशील यांची ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे. पोलीस तपासात अजूनही अनेक बाबी उघडकीस यायच्या असून, फरार असलेला निलेश चव्हाण, व्हिडिओ फुटेज, हुंड्यातील ५१ तोळे सोने, आणि मारहाणीची हत्यारे यांचा शोध घेणं बाकी आहे.

“फॉर्च्युनरसाठी आम्ही छळ करणार?” – श्रीमंतीचा वकिलांचा दावा
हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी दावा केला की, “आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत, आम्ही ४० लाखांच्या गाडीपायी छळ करणार का?” अशा शब्दांत त्यांनी पोलीस कोठडी नाकारण्याची मागणी केली आणि न्यायालयीन कोठडी देण्याचा आग्रह धरला.

फरार आरोपी निलेश चव्हाणचा शोध सुरु
या प्रकरणातील निलेश चव्हाण अजूनही फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी आता सहा पथकं तैनात केली आहेत. त्याच्यावर वैष्णवीच्या बाळाची जबाबदारी होती, मात्र त्याच्यावरच गुन्हा दाखल केल्याचा विरोध हगवणेंच्या वकिलांनी केला आहे.

(व्हिडीओ बघा)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] चव्हाण विरोधातील गुन्हे(Nilesh Chavan Arrested) वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सहआरोपी नऊ […]

Don`t copy text!