वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी मोठी कारवाई: ९ महिन्यांचं बाळ आईवडिलांकडे सुपूर्द

0

📍 पुणे | २२ मे २०२५ – Vaishnavi Hagawane Suicide Case मुळशी तालुक्यातील भुकूम येथे आत्महत्या केलेल्या वैष्णवी शशांक हगवणे प्रकरणात तिचं ९ महिन्यांचं बाळ अखेर आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर पोलीस यंत्रणांनी तातडीने हालचाली केल्या.

🔴 प्रकरणाचा आढावा:(Vaishnavi Hagawane Suicide Case)
१६ मे २०२५: वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलीस तक्रार: हुंडाबळी, मानसिक व शारीरिक छळाचा आरोप; सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल.

शवविच्छेदन: शरीरावर व्रण; आत्महत्या की हत्या – दोन्ही शक्यतेचा तपास.

बाळाचा तपास: काही दिवसांपासून बेपत्ता असलेलं बाळ आता कुटुंबाकडे.

मुख्यमंत्र्यांचे निर्देश: “बाळाची तत्काळ व्यवस्था करा आणि आरोपींवर कठोर कारवाई करा.”

🚔 कोणावर कारवाई?
अटक:
✅ शशांक हगवणे (पती)
✅ लता हगवणे (सासू)
✅ करिष्मा हगवणे (नणंद)

फरार:
❌ राजेंद्र हगवणे (सासरे – अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष)
❌ सुशील हगवणे (दिर)

🧨 हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप:
हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी हगवणे हिने दिलेल्या निवेदनात,

“माझ्यावर चारित्र्यावर संशय घेण्यात आला.”

“सासऱ्यांनी गैरवर्तन केलं.”

“सासू, नणंद, दिर छळ करत होते.”

“पतीला देखील मारहाण झाली.”
असे गंभीर आरोप केले आहेत.

🗣️ अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया:(Ajit Pawar Reaction)
राजकारण तापल्यावर अजित पवारांनी मोजक्या शब्दांत सांगितलं की,

“पक्षाचा हगवणे कुटुंबाशी सध्या कोणताही संबंध नाही.”

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं की,

“राजेंद्र हगवणे कोणत्याही पदावर नाहीत, त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.”

📌 महत्त्वाचे मुद्दे:
वैष्णवीचा मृत्यू संशयास्पद

सीसीटीव्ही तपासात नवे तथ्य उघड

हगवणे कुटुंब आता कायदेशीर चौकशीत

राजकीय पक्षावरही टीकेचा भडिमार

🔍 या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!