वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण :पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती

2

📍 पुणे | २७ मे २०२५ —  Vaishnavi Hagawane Suicide Case  सासरच्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. पोस्टमॉर्टम अहवालातून हे समोर आले आहे की तिच्या शरीरावर एकूण २९ व्रण होते, त्यापैकी ५ ते ६ व्रण हे ताजे होते.

🔍 छळ, मारहाणीचे ठसे:
पोस्टमॉर्टम अहवालानुसार, आत्महत्येच्या अगोदर वैष्णवीवर नियमित मारहाण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी न्यायालयात सादर केली आहे.

👨‍⚖️ कोठडी २८ मेपर्यंत: Vaishnavi Hagawane Suicide Case
या प्रकरणात पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, व नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी यांची ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने त्यांना २८ मे २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

🏦 बँक खाती गोठवली:
हगवणे कुटुंबीयांची सर्व बँक खाती पोलिसांनी गोठवली असून, वैष्णवीच्या नावावर असलेले सोने तारण ठेवून त्यातून मिळालेल्या पैशांचा हिशोब अद्याप स्पष्ट झालेला नाही.

🔎 हत्यारे अजून सापडलेले नाहीत:
वैष्णवीला जी मारहाण झाली त्यामध्ये वापरलेली हत्यारे पोलिसांच्या हाती लागलेली नाहीत. ती कुठे लपवण्यात आली, हे शोधण्यासाठीही कोठडीची गरज असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

🧑‍🤝‍🧑 फरार आरोपींचा शोध सुरु:
या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण व हगवणे कुटुंबातील संबंधांचा तपास सुरू आहे. या चौकशीसाठी सर्व आरोपींना एकत्र ठेवून तपास करण्याची आवश्यकता आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. […] महिला व बालविकास राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटद्वारे याची अधिकृत घोषणा […]

Don`t copy text!