आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा
मुंबई,दि,३ ऑक्टोबर २०२४ – भारतामध्ये जवळपास सर्वच राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु झाल्या आहेत. देशातील सर्वात आधुनिक ट्रेन म्हणून वंदे भारतचं नाव घेतलं जातं. वेग आणि या ट्रेनमध्ये पुरवल्या जाणाऱ्या सुविधांमुळे आपआपल्या राज्यात वंदे भारत ट्रेन सुरु करण्यासाठी प्रत्येक राज्य रेल्वे मंत्रालयाकडे शिफारशी करता आहेत. मध्यंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या मार्गांवरील अर्धा डझनहून अधिक वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवला. या अर्धा डझन ट्रेनमध्ये दुर्ग ते विशाखापट्टणम ट्रेनचाही समावेश होता. मात्र ज्या ज्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत त्या सर्वांनाच चांगला प्रतिसाद मिळतोय असं नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, अनेक मार्गांवर या ट्रेन्स अगदी रिकाम्या धावत असल्याचे धक्कादायक चित्र आहे आहेत.
याच लिस्ट मध्ये नागपूर-सिंकदराबाद मार्गावरील वंदे भारत ट्रेनमधील ८० टक्के खुर्च्या रिकाम्याच असतात.प्रवाशांची संख्या कमी असल्याने केवळ २० टक्के क्षमतेनं ही ट्रेन धावते.नागपूर-सिंकदराबाद मार्गावरील वंदे भारतच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विदर्भ पट्टा हा रामगुंडम, काझीपेठ आणि सिकंदराबादशी जोडण्याचा रेल्वेचा मानस होता. व्यापार, पर्यटन आणि खासगी प्रवासासाठी या मार्गावर उत्तम प्रतिसाद मिळेल अशी रेल्वेची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली असून आता या मार्गावरील वंदे भारत ट्रेन बंद करण्यासंदर्भात विचार सुरु असल्याचे समजते.
नागपूर-सिंकदराबाद मार्गावर केवळ २० टक्के प्रवासी या वंदे भारत ट्रेनला प्राधान्य देत असल्याने या ट्रेनचे अनेक डब्बे रिकामेच असतात. २२ ऑगस्ट रोजी सिंकदराबाद ते नागपूर मार्गावर धावलेल्या वंदे भारत ट्रेन मध्ये एकूण ११४० सीट होत्या. त्यापैकी तब्बल १२०० सीट रिकाम्याच होत्या. याच ट्रेनच्या २ एक्झिक्युटीव्ह डब्ब्यांमधील ८८ सीटपैकी केवळ १० सीट रिझर्व्ह होत्या. म्हणजेच या डब्यांमध्ये ७८ सीट रिकाम्याच होत्या.
सिकंदराबाद-नागपूर वंदे भारतला अती-अल्प प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच या मार्गावरील ही ट्रेन बंद केली जाण्याची दाट शक्यता आहे. या मार्गावर १६सप्टेंबर रोजी वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आलेली. मात्र प्राथमिक स्तरावर प्रवाशांची संख्या कमीच असेल तर आधी या ट्रेनच्या डब्यांची संख्या केली जाईल असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या या ट्रेनला एकूण २० डब्बे आहेत. मात्र असाच कमी प्रतिसाद राहिल्यास ही संख्या 8 पर्यंत कमी केली जाईल असं रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. असं केल्यास ट्रेनमधील सीटची संख्या ५०० ने कमी होईल.