ज्येष्ठ चित्रकार अनिल माळी यांचे निधन

0

नाशिक,दि २६ एप्रिल २०२३-ज्येष्ठ चित्रकार अनिल माळी यांचे आज निधन झाले आहे.ते ६२ वर्षांचे होते..१९८५ कलाशिक्षण पुर्ण केल्या नंतर नव्वदीच्या दशकात नाशिकमधे नाविन्यपुरण प्रदर्शनानी कलाकारकिर्दीला सुरूवात केली नाशिक, पुणे, इंदोर येथे समुह प्रदर्शनात  त्यांचा मोठा सहभाग होता.नाशिकचे चित्रकला शिक्षक अनिल माळी हे अशाच भाग्यवान कलाकारांपैकी. या अवलियाने श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय ही आपली कर्मभूमी निवडली आणि तब्बल तीस वर्षे विशेष विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जन करीत आपली कला खऱ्या अर्थाने सार्थकी लावली. माई लेले श्रवणविकास  संस्थेत विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक म्हणून भरीव कार्य केले होते.

अनिल माळी यांनी  राष्ट्रीय स्तरावरचे काम करवून घेत, त्यांच्या कलेची प्रदर्शने भरविली. अनेकांना रोजगार देत अनोखी पुण्याई कमावली. एक कलाकार म्हणून, रझा हुसेन, हेब्बर या थोर महान कलावंताचा आदर्श गिरवीत, माळी सरांनी स्वतःची अशी वेगळी शैली नाशिक कला कट्टा निर्माण केली, रंग, रंगलेपण, रंगसंवाद, रंगसंगती, रंगछटांचा कमी- अधिकपणा, यामुळे त्यांच्या चित्रांत एक खोली निर्माण झालेली दिसते,

आज सायंकाळी ७ वाजता गंगापूर रोड येथील निवासस्थानहून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून त्यांच्यावर नाशिकच्या अमरधाम स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे..त्यांच्या निधनाने नाशिकच्या कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली- जावई, नातू असा परिवार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!