उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा

 उत्तराधिकारी म्हणून पत्रकार-राजकारणीचे नाव चर्चेत

0

नवी दिल्ली, दि. २१ जुलै २०२५ – Vice President of India resigns देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी वैयक्तिक आरोग्य कारणास्तव आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. त्यांनी सोमवारी रात्री राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. यामुळे देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च घटनात्मक पदावर मोठी रिक्तता निर्माण झाली असून, आगामी उपराष्ट्रपती कोण होणार, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

संविधानिक तरतुदीनुसार राजीनामा (Vice President of India resigns)
धनखड यांनी आपल्या राजीनाम्यात लिहिलं की,

“स्वास्थ्य देखभालला प्राधान्य देत असून वैद्यकीय सल्ल्यानुसार मी भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचा तत्काळ परिणामकारक राजीनामा देत आहे. हा राजीनामा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ६७ (अ) नुसार सादर करीत आहे.”

उपराष्ट्रपती आणि सभापतीपद दोन्ही रिक्त
धनखड हे उपराष्ट्रपती असण्यासोबतच राज्यसभेचे सभापती होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे दोन्ही पदे रिक्त झाली असून, संसदीय कामकाज सुरळीत चालू ठेवण्यासाठी या जागा लवकरात लवकर भराव्या लागणार आहेत.

नवा उपराष्ट्रपती – एक पत्रकार-राजकारणी?
या पार्श्वभूमीवर उपरााष्ट्रपतीपदासाठी काही नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः एक ज्येष्ठ पत्रकारते राजकारणात उतरलेले व्यक्तिमत्व या शर्यतीत आघाडीवर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यावर अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र सत्तारूढ पक्षाच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.

काय आहे घटनात्मक प्रक्रिया?
भारतीय संविधानानुसार, उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यानंतर ६ महिन्यांच्या आत नवीन निवडणूक होणे आवश्यक आहे. तोपर्यंत, राज्यसभेच्या उपसभापतीकडे किंवा राष्ट्रपतीने नियुक्त केलेल्या अन्य राज्यसभा सदस्याकडे सभापतीपदाची जबाबदारी सोपवली जाते.

धनखड यांचा राजीनामा हे राजकारणातील एक महत्त्वपूर्ण वळण मानले जात असून, आगामी उपराष्ट्रपती कोण होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ज्येष्ठ पत्रकाराच्या नावाभोवती सुरू असलेल्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता अधिकच वाढली आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!