Vivo : मोबाईल मध्ये असणार ड्रोन सारखा उडणारा कॅमेरा : लवकरच होणार लॉन्च

0

नवी दिल्ली – मोबाईल मध्ये दररोज काहींना काही नवीन फिचर्स मिळायला बघता मिळता आहेत.मग ती मोबाईलची साउंड क्वालिटी असो या मोबाईलचा कॅमेरा असो या मोबिले क्षेत्रात नवनवीन क्रांती होत असते. आता जर तुम्ही नवीन मोबाईल घेण्याचा विचार करत असला तर आपल्यासाठी विवो कंपनी एक भन्नाट स्मार्टफोन घेऊन येत आहे. या स्मार्टफोन मध्ये ड्रोनसारखा हवेत उडणारा कॅमेरा फिचर्स देण्यात आले आहे.

असा अभिनव प्रयोग जगात पहिल्यांदाच करण्यात आला आहे. या मोबाईलच्या कॅमे-यातून फोटो काढायचा असल्यास कॅमेरा मोबाईलमधून बाहेर येऊन ड्रोनसारखा हवेत उडणार आहे.या मोबाइल फोनबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मोबाईल मध्ये असलेल्या ऍपच्या माध्यमातून ड्रोन कॅमेरा कंट्रोल करून हवा तसा फोटो आणि व्हिडीओ मोबाईल धारकाला काढता येणारा आहे. स्मार्टफोनमध्ये एक कंपार्टमेंट देऊन त्यामध्ये हिडेन कॅमेरा सिस्टिम दिली गेली आहे. त्यात दोन कॅमेरा सेंसर्स असतील. या मोबाईलमध्ये एकूण चार कॅमेरा असणार आहेत. सिस्टम इंटीग्रेटेड प्रोपेलर्सच्या मदतीने ड्रोन कॅमेरा हवेत उडणार आहे.

त्यात दिलेले इन्फ्रारेड सेन्सर हा कॅमेरा किती दूर जाईल याचा मागोवा घेईल. हा फ्लाइंग कॅमेरा शूटिंग करताना लवचिकता प्रदान करेल असेही अहवालात म्हटले आहे. जर कंपनीने असे केले तर बाजारात उपस्थित असलेल्या इतर कंपन्यांसाठी हे एक कठीण आव्हान सिद्ध होईल आणि विवो या विभागातील उर्वरित कंपन्यांना मागे टाकेल अशी चर्चा आहे.

अहवालानुसार, पेटंटमध्ये वैशिष्ट्यीकृत कॅमेरा प्रणाली पॅनेलच्या बाहेर सरकेल आणि माउंटिंग ब्रॅकेटसह पूर्णपणे काढून टाकली जाईल. असे म्हटले जात आहे की फिंगरप्रिंट सेन्सर माउंटिंग ब्रॅकेटमध्ये एकत्रित केले जाईल. ही कॅमेरा प्रणाली एकात्मिक प्रोपेलर्सच्या मदतीने उडेल. विवोनं या स्मार्टफोनसाठी डिसेंबर २०२० मध्येच पेटंट दाखल केलंय पण, हा फोन कधी येणार ? याची किंमत किती असेल हे अद्याप कंपनीने जाहीर केलेलं नाही आहे. हा स्मार्टफोन बाजारात आल्यास अनेक मोबाईल कंपन्यांना मात्र ,भारी पडू शकतो.सध्या सोशल मीडियावर या मोबाईल विषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.