नाशिक – सातपुर विभागातील, त्रंबक रोड, आय.टी.आय. समोर मेघा इंडस्ट्रीज कंपाऊंड लगत ६०० मी.मी. व्यासाची शुध्द पाण्याची ग्रॅव्हेटी मेन पाईपलाईनची दुरुस्तीचे काम कराचे आहे.या ठिकाणी संपुर्ण पाईप बदलायचा असल्याने तसेच गंगापुर डॅम पंपीग स्टेशन रस्त्यावरील उर्ध्ववाहीनी (रायझिंग मेन) पाईपलाईनला गळती सुरु झालेली आहे. त्यामुळे सदर ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचे तातडीने कराचे असल्याने शनिवार दि. २७ नोव्हेंबर २०२१ रोजी संपुर्ण दिवस नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे तसेच रविवार दि.२८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. अशी माहिती कार्यकारी अभियंता साआअवि (पापु)नाशिक महानगरपालिका यांनी केले आहे.
तसेच शनिवारी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी मुकणे डॅमची २२० के.व्ही फिडर लाईनक रीता (विद्युत वाहीनी) होणारा वीजपुरवठा बंद असल्याने नाशिक शहरातील मुख्य पाईपलाईनचे दुरुस्तीचे व देखभाल दुरुस्तीचे व कामे हाती घायची शहरात संपूर्ण दिवस पाणीपुरवठा होणार नाही.नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन नाशिक महानगर पालिके तर्फे करण्यात आले आह.