नाशिक,२० फेब्रुवारी २०२३ – नाशिक महानगरपालिकेतील शहर स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या ‘वॉटरग्रेस प्रोडक्ट्स’ कंपनीने बेकायदेशीररीत्या काढल्याने उपासमारीचे संकट ओढवलेल्या अन्यायग्रस्त ४५० ते ५०० सफाई कामगारांना सनदशीरमार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी आज सोमवार दिनांक २०फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०९.०० वाजेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व सफाई कामगार त्यांच्या कुटुंबीयांसह नाशिक महानगरपालिकेच्या दारावर ‘आमरण उपोषणास’ बसले आहेत.
सदर प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारंवार विविध मार्गांनी ह्या गोरगरीब कामगारांच्या समस्या मा. मुख्यमंत्री, मा. पालकमंत्री आदींसह मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन, मा. न्यायालय आदि विविध स्तरांवर मांडले. मात्र अद्यापही ह्या कामगारांना न्याय मिळाला नसून नाईलाजाने शेवटचा पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या सत्याग्रहाच्या आमरण उपोषणाच्या हत्याराचा उपयोग केला आहे.
आज सकाळी ०९.०० वाजेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, सर्व सफाई कामगार, त्यांच्या नातेवाईकांसह नाशिक महानगरपालिकेच्या दारावर ‘आमरण उपोषणास’ बसले आहेत. उपोषणाला बसण्याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालकमंत्री मा.ना. दादाजी भुसे साहेब, मा. जिल्हाधिकारी साहेब, मा. मनपा आयुक्त, मा. पोलीस आयुक्त साहेबांना याची माहिती देऊनही या बाबत शासन / प्रशासनाला जाग आलेली नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष परशुराम साळवे, शहराध्यक्ष दिलीप दातीर, माजी स्थायी समिती सभापती सलीम (मामा) शेख, महिला सेना प्रदेश उपाध्यक्षा सुजाता ताई डेरे, शहर उपाध्यक्ष संतोष कोरडे, विभाग अध्यक्ष योगेश (बंटी) लभडे, नितीन माळी व धिरज भोसले, शहर सरचिटणीस मिलिंद कांबळे, ज्ञानेश्वर बगडे, शहर संघटक हरीश गुप्ता, जनहित कक्ष जिल्हा संघटक प्रफुल बनभेरू, कामगार सेना चिटणीस तुषार (बंटी) जगताप, महिला सेना शहराध्यक्षा अक्षरा घोडके, अॅड. महेंद्र डहाळे, विशाल भावले, पंकज दातीर यांच्यासह ‘वॉटरग्रेसचे समाधान चव्हाण, गणेश दातीर, किशोर जाधव यांच्यासह २५० कामगार त्यांच्या कुटुंबियांसह ‘वॉटरग्रेस’ च्या ठेकेदारांच्या अन्यायीकृती विरोधात आमरण उपोषणास बसले आहेत.