मुंबई –एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडा नंतर आज त्यांनी पहिल्यांदा मीडियाला प्रतिक्रिया दिली आहे. माझा गट हीच शिवसेना असून मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून मी शिवसेना सोडली नाही आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. आज आमच्याकडे शिवसेनेचे ४६ आमदार असून त्यामुळे अजय चौधरी यांची निवड नियम बाह्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
काही आमदारांना घेऊन शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र ४६ हून अधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. शिंदे आणि इतर आमदारांनी केलेल्या बंडानंतर आता प्रश्न उपस्थित होत आहे तो सत्तांतर होणार का?