धनु ,मकर,कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी : शनिशास्त्र   

हरिअनंत,नाशिक

0

(हरिअनंत,नाशिक) मेष,धनु व सिंह राशीत लोखंडाच्या पावलाने शनीचा प्रवेश म्हणजे काय? लोह चरण पर जब प्रभू आये धन संपत्ती नष्ट कराये लोखंडाच्या पावलाने शनी जेंव्हा राशीत प्रवेश करतो तेंव्हा अतिशय सावध राहिले पाहिजे. कोणत्याही कारणाने आपल्या धनाची नुकसान होऊ शकते यासाठी मेष, धनु आणि मेष राशीच्या व्यक्तींनी आपले धन खर्च करण्यापूर्वी अतिशय विचारपूर्वक   महत्वपूर्ण गरज असेल तरच धन खर्च केले पाहिजे अन्यथा नुकसान होण्याचीच शक्यता जास्त. अर्थात आपले कर्म योग्य असतील तर शनी निश्चितच आपले नुकसान होऊ देणार नाही.

२९ एप्रिलला शनीने मीन राशीत प्रवेश केलाय  साडेसाती शब्द ऐकूनचं काही व्यक्ती अतिशय घाबरतात पण मी यापूर्वीही सांगितलंय की ज्यांचे कर्म चांगले आहे त्यांनी मुळीच घाबरायचे नाही. कर्म उत्तम असतील तर गेल्या पंधरा- विस वर्षांपासून आपण एखादे महत्वपूर्ण काम होण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर ते काम या साडेसातीत सहज पूर्ण होईल.साडेसातीत शनी त्रासच देतो असे मुळीच नाही तर सुयोग्य कार्य करणाऱ्या  नीतिमान व्यक्तीचे साडेसातीच्या काळात कल्याण ही करतो मात्र हे ही निश्चित गोड बोलून केसाने  गळा कापणाऱ्या भांमट्याना ,गर्विष्ठ, सतत दुसऱ्याचा अपमान करणाऱ्यांना शनी जन्माची अद्दल घडवतो.

मीन राशीवर शनीच्या प्रथम चरणाचा प्रारंभ ,धनु राशीची साडेसाती समाप्त झाली असली तरी संपत्तीचा बाबतीत धनु राशीच्या व्यक्तींनी कुठलाही आर्थिक व्यवहार करताना सावध राहिले पाहिजे. मकर राशीची साडेसाती सुरूच आहे, मकर राशीवर साडेसातीच्या तिसऱ्या चरणाचा प्रारंभ, कुंभ  राशिवर साडेसातीच्या दुसऱ्या चरणाचा प्रारंभ झालाय. साडेसातीच्या काळात शनीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून  लोक विविध प्रकारचे उपाय करीत असतात पण  तुम्ही काय उपाय करतात याच्याशी शनिला काहीही देणं- घेणं नसतं.

सर्वात महत्वाचे म्हणजे  शनी ज्या राशीत प्रवेश करतो त्यांचे  म्हणजे  ज्यांच्या जीवनातील प्रथम साडेसाती आहे त्यांचे आत्ताचे आणि पूर्वजन्मीचे कर्म त्या कर्मानुसार शनी फल देत असतो. मीन राशिवाल्या व्यक्तींनी  घरातून बाहेर पडताना संकोच न करता शनीचे स्मरण करून नमस्कार करावा, शनिवारी शनीचे दर्शन घ्यावे गाईला गुळ व कुत्र्याला भाकरी, पोळी, किंवा बिस्कीट खाऊ घालावे चुकूनही साडेसातीच्या काळात स्त्रीचा अपमान करू नये, माता- पित्यास उलट उत्तर देऊ नये. कारण साडेसातीच्या काळात जर—(क्रमशः) भाग-१६२

साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव  सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत 

Hari Ananat -Shani Shastra
हरिअनंत,नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.