Whatsapp लवकरच लॉन्च करणार नवे फीचर : “आता अ‍ॅडमिनला मिळणार विशेष अधिकार”

0

नवी दिल्ली – जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेले व्हॉट्सअ‍ॅप लवकरच एक नवे फीचर लॉंच करणार असून,या नव्या फीचर मुळे ग्रुपच्या अ‍ॅडमिनला ग्रुपवरील मेसेज सर्वांसाठीच डिलीट करता येणार आहेत.यामुळे ग्रुपच्या विचारसरणीशी सुसंगत नसलेले तसेच वादग्रस्त  मेसेज ग्रुपमधील सदस्यांनी बघायच्या आधी हटवण्याचा अधिकार अ‍ॅडमिनला असणार आहे.

Wabetainfo ने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील मेसेज डिलीट करण्याची सुविधा लवकरच अँड्रॉइड मोबाईल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. “जर तुम्ही एखाद्या ग्रुपचे अ‍ॅडमिन असाल, तर व्हॉट्सअ‍ॅप बीटाच्या येणाऱ्या अपडेटमध्ये तुम्हाला ग्रुपमधील मेसेज (delete messages for everyone) सर्वांसाठी डिलीट करता येणे शक्य होणार आहे.” असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.त्यामुळे मध्यंतरी आक्षेपार्ह्य पोस्ट मुळे अडचणीत येणाऱ्या ऍडमिन ची सुटका होणार आहे ?

प्राप्त माहितीनुसार  मेटाच्या  मालकीची ही कंपनी गेल्या काही दिवसांपासून या फीचरवर काम करत असून  यावर अनेक टेस्टिंग झाल्या आहेत. हे फीचर लवकरच रिलीज होण्याची शक्यता आहे. या फीचरला मॉडरेशन फीचर म्हणतात. हे टेलिग्रामवरील फीचरसारखेच असणार आहे. हे फीचर लॉन्च झाल्यानंतर, ग्रुप ऍडमिनला  त्याच्या ग्रुपमधील कोणत्याही मेंबरचा मेसेज आक्षेपार्ह वाटल्यास तो डिलीट करता येऊ शकतो. या फीचरची अनेक दिवसांपासून ग्रुपकडे मागणी होत होती. आता यूजर्स या नवीन फीचरच्या रिलीजची वाट पाहत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप फीचर्स ट्रेकरने शेअर केलेल्या स्क्रीनशॉट्सनुसार, जेव्हा एखादा अ‍ॅडमिन एखादा मेसेज डिलीट करतो तेव्हा “This was deleted by an admin” अशी नोट दिसेल.या नवीन फिचर मुळे ग्रुपच्या हिताच्या विरोधात जाणारे मेसेज काढून टाकण्यात अ‍ॅडमिनला मदत होईल.काही दिवसांपूर्वी, व्हॉट्सअ‍ॅप ‘डिलीट मेसेज फॉर एव्हरीवन’ फीचरची वेळ मर्यादा वाढवण्यावर काम करत होते. सध्या, वापरकर्त्यांकडे एकदा पाठवलेला संदेश फक्त एक तास, आठ मिनिटे आणि सोळा सेकंदांपर्यंत डिलीट करण्याचा पर्याय आहे. परंतु व्हॉट्सअ‍ॅप फीचर्स ट्रॅकर Wabetainfoने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या अपडेटमध्ये वापरकर्त्यांना मेसेज पाठवल्यानंतर सात ते आठ दिवसांपर्यंत डिलीट करण्याचा पर्याय मिळणार आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.