मुंबई – दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार आहेत.दहावी बारावी परीक्षांसदर्भात कुणी तरी माध्यमातून खोटी बातमी पेरली होती. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाची परिस्थिती माॅनिटर करत असून ठरलेल्या परीक्षांच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही असे महत्वपूर्ण विधान राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
तसेच जे विद्यार्थी कोरोना काळात परीक्षेला बसू शकणार नाही त्यांच्यासाठी सप्लिमेंट्री परीक्षा घेण्यात येणार आहे.दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
त्या पुढे म्हणाल्या गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांचे मोठयाप्रमाणावर नुकसान झाले आहे. १० वीच्या परीक्षे नंतर ११ वी ची प्रवेश प्रक्रिया ही सुरु करावी लागणार आहे. त्यामुळे या परीक्षा वेळेत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असे हि त्यांनी स्पष्ट केले.