मुंबई,२६ ऑगस्ट २०२२ – झी मराठी वाहिनीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ ह्या नवीन मालिकेला प्रेक्षकांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ह्या मालिकेत अभिनेता रोहित परशुराम या नवीन कलाकाराचे आगमन होणार आहे. रोहितने उत्तम अभिनयाच्या जोरावर अनेक नाटकं, मालिका व वेब सिरीज मध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या अभिनयातुन ‘अर्जुन’ या भूमिकेतही रोहित रंगत आणणार आहे. रोहित परशुरामशी त्याच्या ह्या मालिकेबद्दल व भूमिकेबद्दल साधलेला हा खास संवाद.
१. ह्या मालिके बद्दल तुला काय वाटतं आणि हि मालिका तुला कशी मिळाली ?
– खूप छान मालिका आहे एक वेगळा विषय मांडला आहे. एक प्रेरणा देणारी मालिका आहे.जेव्हा मला मकरंद गोसावींनी स्क्रिप्ट पाठवली तेव्हा ‘अर्जुन’ ला मी त्यांच्या कडून जाणून घेतले . या नंतर मी मनात अर्जुनाचा विचार करून दोन ऑडिशन्स पाठवले आणि सुदैवाने पहिल्याच ऑडिशन मध्ये गोसावी सरांना हवा असलेला अर्जुन भेटला. यासाठी मी झी मराठी व वज्र प्रोडक्शन टीमचा मना पासून ऋणी आहे.
२. अर्जुन ह्या भूमिके बद्दल काय सांगशील ?
– मी ह्या मालिकेत अर्जुन ची बहुरंगी भूमिका साकारत आहे. अर्जुनच्या भूमिकेला अनेक पैलू आहेत. अर्जुन हा एक पोलीस ऑफिसर असून त्याचा चतुर स्वभाव ,काम करण्याचे कसब वेगळेच आहे.आपल्या अंगी असलेल्या अनेक गुणांचा तो पोलीस ऑफिसर म्हणून उपयोग करून घेताना दिसेल. आपल्या कुटुंबा विषयी त्याला अर्जुनला प्रेम व जिव्हाळा आहे. या मालिकेतुन अर्जुन हे पात्र एक वेगळं वळण आणणार असून ते पाहणे प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरेल.
३. तुला जेव्हा हि मालिका भेटली तेव्हा तुझ्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती ?
– जेव्हा माझा घरच्यांना हि मालिका मी करतो आहे हे समजले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया अशी होती कि ते खूप आनंदून गेले. अगदी निशब्ध झाले कारण, त्यांनी माझा ह्या क्षेत्रातील संघर्ष पाहिलाय आणि अनुभवला आहे. त्यांच्या मनात एकच इच्छा होती कि माझ्या प्रयत्नांना यश यावे. माझे आई , बाबा, भाऊ व पत्नी या सर्वांच्या पाठबळा मुळे मी उमेदीने संघर्ष करू शकलो.ह्यासाठी मी त्यांचा आजन्म ऋणी आहे. माझा व माझ्या कुटुंबाच्या तपश्चर्येला हे गोड़ फळ मिळाले.
४ . तुझ्या सहकलाकारांबद्दल काय सांगशील ?
-इतके अप्रतिम कलाकारांची टीम आहे. शिवानी नाईक हि एक उत्तम अभिनेत्री आहे. संतोष पाटील सारखे अनुभवी व जेष्ठ कलाकार आणि मातब्बर दिग्दर्शक, जो कलाकाराकडून अभिनय खूप चांगल्या पणे करून घेतो. अश्या सगळ्या उत्तम टीम बरोबर काम करताना एका जबाबदारीची जाणीव होते आणि त्यातूनच एक चांगली कलाकृती निर्माण होते. सेटवर प्रसन्न वातावरण आल्यामुळे काम करताना खूप उत्साह वाटतो आणि शिकायला भेटते.
‘अप्पी आमची कलेक्टर ‘ सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता झी मराठीवर.