काँग्रेसला मोठा धक्का : गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा

सोनिया गांधी यांना पाठवले पाच पानी पत्र

0

नवी दिल्ली,२६ ऑगस्ट २०२२- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यामागची कारणे अद्याप उघड झालेली नाहीत. पक्षाच्या धोरणांवर ते बराच काळ नाराज होते आणि ज्या पक्षाने त्यांना जम्मूमध्ये जबाबदारी दिली होती, त्या पक्षाचा त्यांनी राजीनामा दिला होता. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानी राजीनामा पत्र पाठवले आहे. यासोबतच पक्षाचे नेते राहुल गांधी यांना अनुभव नसलेल्या लोकांनी घेरले आहे, असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिलेल्या राजीनामा पत्रात असे लिहिले आहे की, “अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावनिक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचा माझा अर्धशतक जुना संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.”

गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अनेकांना नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण पक्षातील महत्त्वाच्या नियुक्त्या करताना त्यांचा सल्ला घेण्यात येत असे तसंच ते पक्षात सक्रिय होते. काही दिवसांपूर्वी नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी केलेल्या आंदोलनात आझाद सहभाही होते. शिवाय त्यांनी पत्रकार परिषदेलाही संबोधिक केलं होतं.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.