झी मराठी अवॉर्ड्स २०२१ सोहळ्यात पडद्यामागच्या कलाकारांचा सन्मान

0

मुंबई-कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासोबतच एक उत्तम कलाकृतीच्या मागील भक्कम उभे असलेले अजून ३ खांब म्हणजे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हे तिघेही सदैव तत्पर असतात. मालिकेची कथा ही लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्या निरीक्षणातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सादर होते. या पडद्यामागच्या सूत्रधारांचा सन्मान देखील कलाकारांच्या सन्मानाइतकाच मोठा आहे आणि झी मराठी अवॉर्ड्स २०२१ या सोहोळ्याच्या निमित्ताने वाहिनीने कलाकार आणि तंत्रज्ञांसोबतच सर्व मालिकांचे लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक यांचा देखील सन्मान केला.

इतकंच नव्हे तर या पडद्यामागच्या कलाकारांची ओळख सगळ्यांना व्हावी यासाठी वाहिनीने सर्व दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक यांची जाहिरात केली, तसंच महाराष्ट्रभर त्यांचे मोठे होर्डिंग्स सुद्धा लावण्यात आले आहेत. पडद्यामागच्या या सूत्रधारांचा चेहरा देखील रसिक प्रेक्षकांच्या ओळखीचा व्हावा हा वाहिनीचा उद्देश यामागेआहे.लेखक-संकर्षण कऱ्हाडे, प्रह्लाद कुडतरकर, अद्वैत दादरकर, किरण कुलकर्णी, पल्लवी करकेरा, राजेंद्र घाग, स्वप्नील गांगुर्डे, विशाल कदम, अंबर हडप, स्वप्नील चव्हाण, नीलपरी गायकवाड, सुखदा आयरे दिग्दर्शक-राजू सावंत, अजय मयेकर, मंदार देवस्थळी, अनिकेत साने, अमित सावर्डेकर, हरीश शिर्के, स्वप्नील मरोडे आणि निर्माते-सुनील भोसले, तेजेंद्र नेसवणकर, संदीप जाधव, तेजपाल वाघ, संजय झंकर, सुवर्णा राणे, संतोष कोल्हे या सगळ्यांच्या उपस्थितीत हा सन्मान क्षण रंगला.

Zee Marathi Awards 2021

या सगळ्यांचा सत्कार करून वाहिनीने त्यांचे आभार मानले. झी मराठीवर सादर होणाऱ्या सर्व मालिका प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करतात आणि या मनोरंजनाच्या पर्वणीचे खरे सूत्रधार असलेले हे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते या सन्मान क्षणी भारावून गेले. त्यांचा हा सन्मान क्षण पाहण्यासाठी बघायला विसरू नका-झी मराठी अवॉर्ड्स २०२१ शनिवार ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.