Zee Marathi : फु बाई फू परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
तुम्ही हसणार पोट धरून... कारण इथे कॉमेडी होणार भरभरून.
मुंबई १३ ऑक्टोबर, २०२२ – झी मराठी नेहमीच प्रेक्षकांच मनोरंजन वेगवेगळे कार्यक्रम सादर करून करत आली आहे. फू बाई फू या कार्यक्रमाचे तब्बल १४ भाग प्रदर्शित झाले होते. आता ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा झी मराठी घेऊन येत आहे.
कॉमेडीचा एक नवीन तडका फु बाई फु हा कार्यक्रम. या कार्यक्रमात कॉमेडीचे कार्यक्रम गाजवलेले हरहुन्नरी कलाकार दिसणार आहेत. तसेच काही नवे कलाकार देखील या कार्यक्रमात असणार आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मराठीतील आघाडीची अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार असून परिक्षणाची जबाबदारी कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत आणि उमेश कामत करणार आहेत. या कार्यक्रमात हास्याची धमाल उडवून देणारे कलाकार कोण असणार आहेत याचीच चर्चा होताना सध्या दिसत आहे.
तुम्ही हसणार पोट धरून… कारण इथे कॉमेडी होणार भरभरून. पाहायला विसरू नका “फु बाई फू” ३ नोव्हेंबर पासून गुरुवार ते शनिवार रात्री ९:३० वा. झी मराठीवर