मुंबई.दि ११ जुलै २०२३ – मंत्री छगन भुजबळां यांना जीवे मारण्याची धमकी फोन आल्या नंतर शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीतील घरी धमकीचा फोन आला होता.
राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ त्यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्यानं छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचं सांगितलं. दरम्यान, धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीनं मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या कडे फोन करणाऱ्या व्यक्तीने मला ५० हजार रुपये द्या, नाहीतर मी तुम्हाला जीवे मारिन अशी धमकी फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तर छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीनं मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचं सांगितलं. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं स्वतःचं नाव प्रशांत पाटील असल्याचं सांगितलं. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून पुणे पोलिसांना तात्काळ या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी मोबाईल नंबरच्या आधारे प्रशांत पाटील या व्यक्तीला महाडमधून पुणे पोलीसांनी अटक केली आहे.मद्यधुंद अवस्थेत प्रशांत पाटीलनं मंत्री छगन भुजबळांना धमकी दिल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपी प्रशांत पाटील मूळचा कोल्हापूरचा आहे.
सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पुणे पोलिसांनी प्रकरणाची सर्व माहिती घेऊन चौकशी सुरू केली. संशयितचा शोध सुरू करण्यात आला. अखेर धमकी देणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी महाडमध्ये बेड्या ठोकल्या. प्रशांत पाटील असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.दरम्यान,या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आज छगन भुजबळ पुण्याहून मुंबईला रवाना होणार आहेत.